Homeआरोग्यदातांच्या व जबड्यांच्या सर्व समस्यांवर आता मावळातच उपचार होणार - डॉ प्रवीण...

दातांच्या व जबड्यांच्या सर्व समस्यांवर आता मावळातच उपचार होणार – डॉ प्रवीण माने

दातांच्या व जबड्यांच्या सर्व समस्यांवर आता मावळातच उपचार होणार – डॉ प्रवीण माने

तळेगाव दाभाडे: शहरातील डॉ प्रविण माने व डॉ वर्षा माने हे त्यांच्या डॉ मानेज् डेंटल क्लिनिक च्या माध्यमातून गेल्या १८ वर्षांपासून मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे दातांविषयक समस्यांवर उपचार अगदी उत्तमरीत्या व सेवाभावी पद्धतीने रूग्णांपर्यंत पोहोचवत आहेत. मावळ तालुक्यातील फक्त तळेगावच नव्हे तर वडगाव , कामशेत, लोणावळा , देहूरोड , सोमाटणे परीसर व पवन मावळ , आंदर मावळ , नाणे मावळ या भागातील हजारो रूग्णांनी त्यांच्या सेवेचा व कौशल्याचा लाभ आजपर्यंत घेतला आहे. दातांविषयक उपचारांसंबंधीच्या नवनवीन तंत्रज्ञान आणि प्रणाली मावळ तालुक्यात उपलब्ध करून देण्याच्या हेतूने डॉ प्रविण व डॉ वर्षा यांनी दातांच्या उपचारांविषयक तंत्रज्ञानातील सर्वांत अत्याधुनिक असे ” सी बी सी टि ” म्हणजेच जबड्याचा सी टि स्कॅन करण्याचे मशीन व इतर सर्व डिजिटल डेंटल मशिनरीसह अत्यंत निष्णात अशा १० एम डि एस म्हणजेच दातांविषयक उपचारांमधील सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स ना एकत्र आणून तळेगाव दाभाडे येथील मारूती मंदिर चौक येथे नवीन व मोठ्या जागेत सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना सुरू केला आहे.

डॉ मानेंनी उपलब्ध केलेल्या या सोयीमुळे आता डेंटल इप्लांट म्हणजेच हाडात मेटल चा स्क्रू बसवून त्यावर फिक्स दात बसवणे ही सध्याची सर्वांत अत्याधुनिक दातांची उपचारपद्धती आता अगदी सुरुवातीच्या तपासणी पासून, जबड्याच्या हाडाचा सी टी स्कॅन करण्यापासून ते फिक्स दात बसवणे हे सर्व आता एकाच छताखाली शक्य होणार आहे.

तसेच तरूणाई मध्ये सध्या सर्वांत जास्त चर्चेत असलेली तारांचा वापर न करता वेडेवाकडे दात सरळ करण्याची अत्याधुनिक उपचारपद्धती म्हणजेच डेंटल अलायनर्स हे भारतातील सर्वांत नामवंत व सुप्रसिद्ध डेंटल लॅबोरेटरी च्या मार्फत या दवाखान्याच्या माध्यमातून मावळात उपलब्ध होणार आहेत.

या दवाखान्यात डॉ प्रविण व डॉ वर्षा यांच्यासोबतच लहान मुलांच्या दातांविषयक उपचारांमधील तज्ञ म्हणजेच पिडोडॉन्टिस्ट , वेडेवाकडे दात सरळ करणारे तज्ञ म्हणजेच ऑर्थोडॉन्टिस्ट , डेंटल इंप्लांटॉलॉजिस्ट , ओरल ॲन्ड मॅग्झिलोफेसियल सर्जन , हिरड्यांचे तज्ञ म्हणजेच पेरीओडॉन्टिस्ट , रूट कॅनाल स्पेशालिस्ट असे सर्व डेंटल स्पेशालिस्ट उपलब्ध असणार आहेत.

मावळ तालुक्यातील सर्व रूग्णांनी त्यांच्या दातांविषयक आरोग्याच्या तक्रारींसाठी डॉ माने डेंटल क्लिनिक ला भेट द्यावी व इथल्या अत्याधुनिक सोयीसुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ प्रविण माने यांनी केले आहे.

*नोट/बाईट* 

दातांविषयक अनेक अत्याधुनिक उपचारांसाठी आजही मावळ तालुक्यातील कित्येक रूग्ण‌ पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यातील डॉक्टर्स कडे जातात. त्यांची गरज लक्षात घेऊन सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा , उपचार प्रणाली व तितक्याच निष्णात डॉक्टर्स ना सोबत घेऊन मावळवासीयांच्या सेवेत आम्ही एक मोठा पर्याय उपलब्ध करून देत आहोत. मावळवासिय नक्कीच या सेवेचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे.अपॉंईंटमेंटसाठी ९२७०२१२३१२ / ७२७६२८२७६२ या क्रमांकावर संपर्क साधावा.डाॅ वर्षा माने.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

वडगाव येथे उद्या “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर”; नागरिकांना १५ हून अधिक महसुली सेवा...

वडगाव येथे उद्या “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर”; नागरिकांना १५ हून अधिक महसुली सेवा एकाच छताखाली उपलब्ध वडगाव मावळ : महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य...

रोहित पवारांच्या दाव्यानंतर राजकीय खळबळ; आमदार सुनील शेळकेंचे जोरदार प्रत्युत्तर

रोहित पवारांच्या दाव्यानंतर राजकीय खळबळ; आमदार सुनील शेळकेंचे जोरदार प्रत्युत्तर Rohit Pawar यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते भाजपमध्ये जाणार असून त्यांच्यासोबत १५ आमदारही जाणार...

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

error: Content is protected !!