दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लक्ष्मण हाके वर गुन्हा दाखल करण्याची अखंड मराठा समाज मावळ ची मागणी
वडगाव मावळ : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको अशी भूमिका घेणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा येथे सभेचे आयोजन केले होते या सभेत बोलताना हाके यांनी मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले या वक्तव्यानंतर हाके यांच्या विरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून.
मनोरुग्ण हाके च्या विरोधात अखंड मराठा समाज मावळतर्फे गुन्हा दाखल करण्याची मागणी वडगाव मावळ पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून मावळ मधील अखंड मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पीआय कुमार कदम यांना निवेदन सादर करत लक्ष्मण हाके यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदवावा अशी ठाम मागणी केली आहे.
तसेच तहसीलदार कार्यालयात देखील एक निवेदन सादर करण्यात आले असून या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.
(१) कुणबी नोंदीची पुन्हा फेरतपासणी करून त्या नोंदी ग्रामपंचायत मध्ये सार्वजनिक रित्या डिस्ले करण्यात याव्या.
(२) कुणबी दाखल्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करावा अशा महत्त्वपूर्ण मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले असून या संदर्भात नायब तहसीलदारांनी सर्व मागण्यांची अंमल बजावणी करण्याचे लिखित आश्वासन दिले याबाबत गुरुवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी महत्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती अखंड मराठा समाज मावळ चे समन्वयक नरेंद्र शहाजी मुर्हे यांनी दिली आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११



















