Homeताज्या बातम्यामावळवासीयांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा – आमदार सुनील शेळके

मावळवासीयांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा – आमदार सुनील शेळके

मावळवासीयांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा – आमदार सुनील शेळके

पुणे/मावळ – मावळ मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आणि अखंड वीजपुरवठा मिळावा या दृष्टीने आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पुणे मंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षातील डीपीडीसी निधीतून मंजूर कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. विशेषतः राजमाची, कळकराईसारख्या दुर्गम भागांतील वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या कामांसाठी वनविभागाची आवश्यक परवानगी घेऊन लवकरच कामांना सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

“आंदर मावळाला सतत भेडसावणारा वीजेचा लपंडाव आता संपायला हवा. यासाठी वडेश्वर येथे नव्याने मंजूर झालेल्या सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करून सहा महिन्यांत पूर्ण करावे,” असे स्पष्ट निर्देश आमदार शेळके यांनी दिले.

शहरी भागातील ठोस निर्णय

बैठकीत शहरी भागातील समस्यांवरही सखोल चर्चा झाली.

कामशेत शहरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाबाबत व्यक्त केलेल्या असमाधानावर तोडगा काढण्यासाठी फीडर, कंडक्टर आणि जी.ओ.डी. बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या.

ग्रामीण भागातील जुने झालेले डी.पी. बॉक्स तातडीने बदलून नवे बसविण्याचे आदेश देण्यात आले.

देहू शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

देहूरोड कॅंटोन्मेंट परिसरातील वीज समस्यांवर देखील विस्तृत चर्चा करून तातडीच्या उपाययोजना ठरविण्यात आल्या.

या बैठकीस अधीक्षक अभियंता युवराज जरग, सिंहाजी गायकवाड, कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी, अतुल देवकर, किरण सरोदे तसेच वडगाव, लोणावळा, तळेगाव, देहू व देहूरोड येथील विद्युत वितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर प्रविण झेंडे, योगेश काळोखे, विवेक काळोखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

आमदार शेळके यांचा निर्धार

बैठकीदरम्यान बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “मावळवासीयांना अखंड, सुरळीत वीजपुरवठा मिळावा हे आमचे प्राधान्य आहे. गावागावांपर्यंत वीजेचा लपंडाव दूर करून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हीच आमची बांधिलकी आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व पातळीवर आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!