Homeराजकीयराष्ट्रवादी काँग्रेसने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी फुंकले रणसिंग. इच्छुकांकडून मागवले उमेदवारी अर्ज 

राष्ट्रवादी काँग्रेसने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी फुंकले रणसिंग. इच्छुकांकडून मागवले उमेदवारी अर्ज 

तळेगाव दाभाडे : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक कार्यकर्त्यांनी आपले अर्ज शनिवारी, दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

ही माहिती शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, आमदार सुनिल शेळके आणि तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी प्रसिध्दी पत्रका द्वारे दिली.

नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर पक्षाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ ठेवण्यात आली आहे.

उमेदवारी अर्जांचे वितरण व सादरीकरण १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत इच्छुक कार्यकर्ते सुरेश धोत्रे यांच्या शुभम कॉम्प्लेक्समधील जनसंपर्क कार्यालयात जाऊन अर्ज प्राप्त करू शकतात.

भरलेले अर्ज शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी सायं. ६.०० वाजेपर्यंत याच ठिकाणी जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

अर्ज स्वीकृतीनंतर रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता, खांडगे पेट्रोल पंपाजवळील इशा हॉटेल येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. या बैठकीदरम्यान उमेदवारांच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल.

सर्व इच्छुकांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह वेळेत सादर करून संपर्क साधावा, असे आवाहन शहराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!