Homeसामाजिकवडगावमध्ये रविवारी सामुदायिक विवाह सोहळा स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान चे आयोजन

वडगावमध्ये रविवारी सामुदायिक विवाह सोहळा स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान चे आयोजन

वडगावमध्ये रविवारी सामुदायिक विवाह सोहळा स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान चे आयोजन

वडगाव मावळ दि.१७ येथील स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा रविवार दि.२० एप्रिल रोजी संपन्न होणार असून या विवाह सोहळ्यात १८ जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे व सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष अजय धडवले, कार्याध्यक्ष प्रवीण कुडे, कार्यक्रम प्रमुख संजय दंडेल यांनी दिली.

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात रविवारी पहाटे श्रींच्या अभिषेकाने या सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. सकाळी ११ वाजता साखरपुडा, दुपारी १२ ते ३ पर्यंत भोजन समारंभ, दुपारी १.३० वाजता हळदी समारंभ, दुपारी ३ ते ५ नवरदेवाची भव्य मिरवणूक व सायंकाळी ५.३० वाजता लग्न सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान या सोहळ्यानिमित्त सकाळी ९ ते १ पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी हभप नितीन महाराज काकडे, मंगल महाराज जगताप, तुषार महाराज दळवी, दत्तात्रय महाराज टेमगिरे, सुदाम महाराज सानप, बाळासाहेब काशीद उपस्थित राहणार असून यावेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय (बाळा) भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, बापूसाहेब भेगडे, माऊली दाभाडे, विठ्ठलराव शिंदे, गणेश खांडगे आदी उपस्थित राहणार आहेत. लग्न समारंभ पूर्वी होणारी नवरदेवाची मिरवणूक या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे.

याप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या हजारो वऱ्हाडी मंडळींना बसण्यासाठी भव्य मंडप तसेच भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संपूर्ण पोशाख, संसारपयोगी भांडी, वधूला चांदीचे अलंकार, मनगटी घड्याळ देण्यात येणार आहे. सामुदायिक विवाह सोहळा समितीचे पदाधिकारी खंडूजी काकडे, विनायक लवंगारे, अक्षय बेल्हेकर, भूषण ढोरे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी नियोजन करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!