शालेय विद्यार्थ्यांसाठी कामशेत येथे शाडूच्या माती पासून गणपती बनवण्याचे प्रशिक्षण
कामशेत : शहरात सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ व लायन्स क्लब कामशेत यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या माती पासून गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर गणेश मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. जवळपास १५० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण शिबिरात उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या आठ वर्षापासून सह्याद्री विद्यार्थी अकादमी राबवत आहे. आपला बाप्पा आपणच बनवूया आणि पर्यावरण वाचूया हा संदेश या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आला. अतिश थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अॅड योगेश गायकवाड, उद्योजक सुनील भटेवरा, संतोष कुंभार, मोहन वाघमारे, अभिमन्यू शिंदे, गजानन शिंदे, मनोज धावडे, सुदेश लाड, प्रताप गुंजाळ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवभक्त सचिन शेडगे, चेतन वाघमारे, अनिल शर्मा, तेजस वाघवले, अमोल तिकोने, वैभव हजारे, बाळासाहेब जमादार, संजय कटके, रूपाली कटके, सोमनाथ चोपडे आदींनी सहकार्य केले.
सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले तर आभार चेतन वाघमारे यांनी मानले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















