Homeसामाजिकमराठा आरक्षण. शेतकरी कर्जमाफी. सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले. वाढती गुन्हेगारी वर अखिल...

मराठा आरक्षण. शेतकरी कर्जमाफी. सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले. वाढती गुन्हेगारी वर अखिल भारतीय छावा संघटनेचा आक्रमक पवित्रा

मराठा आरक्षण. शेतकरी कर्जमाफी. सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले. वाढती गुन्हेगारी वर अखिल भारतीय छावा संघटनेचा आक्रमक पवित्रा

पिंपरी : राज्यातील सध्याचा सर्वात संवेदनशील असलेला मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी यासंदर्भात अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत संतांच्या भूमीत मसाज पार्लरच्या नावाखाली चालणारा वेश्याव्यवसाय तात्काळ थांबवावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

काळेवाडी येथील इंदू लॉन्स याठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे( पाटील) यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली.

नानासाहेब जावळे पाटील म्हणाले की, “मराठा समाजाची सद्यपरिस्थिती नाजूक आहे. त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू करण्याबरोबरच 10 हजार कोटी रुपयांचे आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करावे. तसेच मराठा समाजाच्या अन्य मागण्यांबाबतही तातडीने ठोस निर्णय घ्यावेत. मराठा समाज अद्यापही शांत आणि संयमी भूमिकेत आहे. मात्र आमच्या संयमाचा कडेलोट होण्याची वाट सरकारने पाहू नये, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात बोलताना जावळे पाटील म्हणाले की, “सध्या हवामानाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने त्वरित शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

अखिल भारतीय छावा संघटनेने यापूर्वीही मराठा समाजाच्या हक्कांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक आंदोलने केली आहेत. नानासाहेब जावळे पाटील यांनी यावेळी सर्व सामाजिक घटकांना एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले. “गेल्या 30 वर्षांपासून अखिल भारतीय छावा संघटना शेतकरी आणि सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढत आहे. आणि त्यांच्या न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू,” असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत बोलताना त्यांनी मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर कठोर कारवाईची मागणी केली. “ज्ञानोबा-तुकोबारायांसारख्या संतांची भूमी असलेल्या या शहरात अशा गैरप्रकारांना थारा मिळणे लज्जास्पद आहे.

प्रशासनाने तात्काळ यावर बंदी घालावी,” असे ते म्हणाले. तसेच, सामाजिक कार्यकर्त्यांवर होणाऱ्या भ्याड हल्ल्यांचा निषेध करत त्यांनी या प्रकरणी कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली.याप्रसंगी केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे (पाटील) केंद्रिय सहकार्यध्यक्ष भिमराव मराठे, प्रदेश महासचिव मनोज आण्णा मोरे, पश्चिम महाराष्ट्र मच्छिंद्र भाऊ चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन आण्णा लिमकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राम सुर्यवंशी, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख आशिष खंडेलवाल, सहकार्यध्यक्ष प्रेम भुरे, पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय बोडके, पुणे जिल्हा अल्पसंख्याक सर्फराज भाई शेख, पुणे जिल्हा शिक्षक आघाडी प्रशांत फड, हर्षद नढे यांच्यासह पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा आणि राज्यभरातून संघटनेचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!