स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात कलापिनी नाट्य संस्थेकडून “एका अटीचा संसार” या नाटकाचे अभिवाचन
उर्से : मावळ तालुक्यातील उर्से येथे कार्यरत असणाऱ्या स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात तळेगाव दाभाडे शहरातील कलापिनी नाट्यसंस्थेतर्फे” एका अटीचा संसार ” हा नाट्य अभिवाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राजन खान यांच्या कथेचे नाट्य रूपांतर या ” एका अटीचा संसार”मध्ये करण्यात आले. विनायक लिमये, डाॅ विनया केसकर, डाॅ सुहास कानिटकर यांनी अत्यंत सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीने मांडणी करून या कथेचे ताकतीने सादरीकरण केले.
संसाराच्या उत्तरार्धात पोहचलेल्या विना अपत्य वयस्कर जोडप्याचे भाव विश्व या कथेत सुंदरपणे उघडून दाखविले. कुठल्याही नात्यांमध्ये विशेषतः नवरा बायको या नात्यांमध्ये संवाद किती महत्त्वाचा असतो हे या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवले. यावेळी स्माईल व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्ण मित्रांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या.डाॅ सुहास कानिटकर व केदार अभ्यंकर यांनी संगीत संयोजन केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक हर्षल पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर स्माईल चे हर्षल जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















