Homeराजकीयप्रभाग १३ मधील प्रचारदौर्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद; राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विजयाला गती

प्रभाग १३ मधील प्रचारदौर्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद; राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विजयाला गती

प्रभाग १३ मधील प्रचारदौर्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद; राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विजयाला गती

लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापले असून, या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारे नेतृत्व म्हणून आमदार सुनील शेळके पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा हातात घेतलेल्या आमदार शेळके यांच्या नेतृत्वाखालील प्रभाग क्र. १३ मधील उमेदवारांच्या प्रचारदौर्यास नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

नगराध्यक्ष पदासाठी पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र बबनराव सोनवणे तसेच प्रभाग क्र. १३ मधील उमेदवार श्री. धनंजय वसंत काळोखे, सौ. प्रियांका किशोर कोंडे व सौ. सोनाली संभाजी मराठे यांच्या समर्थनार्थ झालेल्या या दौऱ्यात आमदार शेळके स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधत राहिले. प्रभागातील गल्लीबोळ, वसाहती, व्यापारी पेठा, झोपडपट्ट्या अशा प्रत्येक भागात जाऊन पक्षाच्या योगदानाची व आगामी योजनांची माहिती त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली.

दौर्यात नागरिकांमध्ये दिसलेला उत्साह, उमेदवारांबद्दल निर्माण झालेली सकारात्मक भावना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे संपूर्ण वातावरण निवडणूकपूर्व रंगात न्हाऊन निघाले. अनेक नागरिकांनी विकासकामांवरील सातत्यपूर्ण भूमिका, अचूक समस्या निवारण आणि लोकाभिमुख निर्णयशैलीमुळे आमदार शेळके यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे प्रत्यक्ष संभाषणात व्यक्त केले.

प्रचारदौर्यानंतर स्थानिक पातळीवरील राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी सुनील शेळके यांची संपर्क शैली आणि संघटन कौशल्य अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रभाग १३ मधील प्रचाराने संपूर्ण शहरात राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या ‘विजयी लाटेचा’ संदेश दिला असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढली आहे.

लोणावळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस धोरणे आणि जनतेच्या मनात असणारा त्यांचा स्वीकार पाहता, यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांचे नेतृत्व म्हणजे विजयाचा मार्ग असा सूर शहरभर उमटताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!