Homeक्राईमपोलिसांचा वचक बसण्यासाठी देहूरोड पोलिसांनी काढली गुन्हेगारांची धिंड. दोघांना अटक

पोलिसांचा वचक बसण्यासाठी देहूरोड पोलिसांनी काढली गुन्हेगारांची धिंड. दोघांना अटक

देहूरोड : स्वतःला भाई म्हणवून घेणाऱ्या व परिसरात दहशत पसरवणाऱ्या दोन गुन्हेगारांना देहूरोड पोलिसांनी अटक करून त्यांची धिंड काढली. मारामारी, दरोडा चोरी आणि घातक शस्त्र जवळ बाळगण्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. चंदू गोरख सकट(वय.३८) आणि करण अरुण सकट(वय.२३. दोघे राहणार गांधीनगर देहूरोड) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे असून त्यांच्या दोन फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल चंद्रकांत काळभोर(वय.५० राहणार गांधीनगर देहूरोड) यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवार दिनांक १३जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता काळभोर हे आपल्या घरी जात असताना त्यांच्या शेजारी राहणारे सकट बंधू आणि त्यांचे साथीदार दारू पीत होते.

त्यांनी काळभोर यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नका असे काळभोर यांनी सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी काळभोर यांच्या घरात घुसून लाकडी बॅट आणि लोखंडी रॉडने काळभोर यांना जबर मारहाण केली. व जीवे मारण्याची धमकीही दिली.

काळभोर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून बॅट, लोखंडी रॉड, चाकू जप्त करण्यात आले. त्यांच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. वडगाव न्यायालयाने दोन्हीही गुन्हेगारांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध सुरू असून. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंकी करत आहेत. देहूरोड परिसरात फोफावलेल्या गुंडगिरीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी या गुन्हेगारांची धिंड काढली. गुंडांवर वचक निर्माण व्हावा यासाठी त्यांची खुलेआम धिंड काढण्यात आली.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!