Homeमहत्त्वाचेनाणे गावातील सर्व गौरी गणपतीचे भक्तिमय वातावरणात एकत्रित विसर्जन सोहळा

नाणे गावातील सर्व गौरी गणपतीचे भक्तिमय वातावरणात एकत्रित विसर्जन सोहळा

कामशेत : मावळ तालुक्यातील नाणे गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण गावातील सर्व गौरी गणपतीचे एकत्रित विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने व पारंपरिक जल्लोषात पार पडला. गावाच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक मानला जाणारा हा सोहळा यावर्षीही हजारो ग्रामस्थांच्या सहभागाने अविस्मरणीय ठरला.

गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी गावातील सर्व मंडळे व घरगुती गणेश भक्तांनी एकत्रितपणे इंद्रायणी नदीकाठी विसर्जनासाठी प्रस्थान केले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जल्लोषी घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले होते. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल–ताशांच्या गजरात सर्व गणपतींची मिरवणूक विसर्जन स्थळी पोहोचली.

रिमझिम पावसाची सर असूनही ग्रामस्थांचा उत्साह कायम होता. विशेष म्हणजे महिला भगिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. तरुण, तरुणी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक अशा अबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गावातील नागरिकांसह परिसरातील असंख्य भाविक विसर्जन सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.

विसर्जन स्थळी सर्वांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहाच्या भरात पार पडला. ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागामुळे नाणे गावातील हा विसर्जन सोहळा पुन्हा एकदा गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक ऐक्याचा सुंदर नमुना ठरला.

(प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे, ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!