आमदार सुनिलआण्णा शेळके फाउंडेशन व संग्रामभाऊ जगताप मित्रपरिवार आयोजित खेळ रंगला पैठणी – महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
तळेगाव दाभाडे : आमदार सुनिलआण्णा शेळके फाउंडेशन व संग्रामभाऊ जगताप मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त “खेळ रंगला पैठणी” या भव्य व दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नम्रता आयकॉनिक, तळेगाव स्टेशन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात तब्बल ५०० हून अधिक महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सादरकर्ते राजेश बारणे यांच्या देखण्या सूत्रसंचालनाने वातावरण अधिक रंगतदार झाले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेले शिक्षक गौरव सोहळा होता. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ५० शिक्षकांचा शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला कुलस्वामीनी महिला मंचच्या संस्थापिका सारिका सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, साप्ताहिक अंबरचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, निर्मल वारी संयोजक संतोष दाभाडे (पाटील), शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुहास गरुड, रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे, अध्यक्ष भगवान शिंदे, उपाध्यक्ष सुरेश दाभाडे, तसेच सिनेअभिनेते मोहन खांबेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धांचे विजेते
प्रथम क्रमांकाची श्रीमंत पैठणी – माधुरी केकाणे
द्वितीय क्रमांक सोन्याची नथ – नलिनी गायकवाड
तृतीय क्रमांक चांदीचा छल्ला – अर्चना खरात
लकी ड्रॉ बक्षिसे
स्नेहा सावंत – चांदीचा करंडा
सुकुमारी जगताप – मिक्सर,
अंजना काळे – कुलर
या प्रसंगी सुरेश शेंडे, दिलीप पारेख, नितीन शहा, अमित बांदल, मयूर देशमुख, श्रीकृष्ण पुरंदरे, अॅड. ज्ञानेश्वर केदारी, सुरेश घंगाळे, संजय भागवत, गणेश कुल, करण शेळके, संजय मेहता, भावना शेळके, पत्रकार गणेश बोरुडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, विनोद टकले, तसेच नम्रता आयकॉन सोसायटीचे अध्यक्ष शंकर भोसले, सेक्रेटरी राधाकृष्ण जावळे, खजिनदार डॉ. जयकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. उपवासाचा फराळ, फळे व जेवणाची उत्तम सोय आयोजकांच्या वतीने करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पवार यांनी केले.
हा कार्यक्रम महिलांच्या मोठ्या सहभागामुळे तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे नवरात्र उत्सवात एक संस्मरणीय ठरला.
प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११




















