Homeसामाजिकजिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ आणि नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यात पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांना जीवनगौरव पुरस्कार तसेच गुलाबराव गवळे यांना विशेष कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय मावळ तालुक्यातील ३० शिक्षक आणि पुणे ग्रामीण मधील ५० शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे म्हणाले, “शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून जीवनाचा मुख्य मार्गदर्शक आहे. शिक्षक हा देशाचा कणा आहे. शिक्षण पद्धतीत बदल करून विद्यार्थ्यांची संख्या घटण्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. गुणवत्तेला प्राधान्य देत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अधिक जबाबदारीने काम करावे.”

नगरसेवक संतोष भेगडे म्हणाले, “शिक्षक पुरस्कार हा केवळ सन्मान नसून तो शिक्षकांच्या अथक परिश्रमांचा, निष्ठेचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव आहे.”

या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर विचारमंथन घडवून आणणे हा होता.

कार्यक्रमाला पुणे पीपल्स को-ऑप बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, पुणे महानगर नियोजन समिती सदस्य संतोष छबुराव भेगडे, वडगाव नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्यवाह गुलाबराव गवळे, जिल्हाध्यक्ष निलेश काशीद, कार्यवाह महेंद्र शेलार, संघटन मंत्री रामदास अभंग, श्री डोळसनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, खजिनदार अमित भसे, राजेंद्र भांड, धनकुमार शिंदे, जिल्हा प्रतिनिधी भाऊसाहेब आगळमे, मावळ तालुका अध्यक्ष राम कदमबांडे, कार्यवाह देवराम पारिठे यांच्यासह स्पोर्ट्स फाउंडेशनचे सदस्य व अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम कदमबांडे यांनी केले. सूत्रसंचालन भारत काळे आणि वैशाली कोयते यांनी केले. तर आभारप्रदर्शन समीर भेगडे यांनी मानले.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!