Homeसामाजिकसुनिता महाजन ठरल्या भाग्यशाली “महादुर्गा विजेता 2025” 

सुनिता महाजन ठरल्या भाग्यशाली “महादुर्गा विजेता 2025” 

सुनिता महाजन ठरल्या भाग्यशाली “महादुर्गा विजेता 2025” 

वडगाव मावळ : शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सृजनशीलतेला आणि उत्साहाला व्यासपीठ देणारी “मी दुर्गा बेस्ट सेल्फी आणि रिल्स कॉन्टेस्ट” ही लोकप्रिय स्पर्धा यंदाही अत्यंत उत्साहात पार पडली. वडगाव नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या पुढाकारातून गेल्या सहा वर्षांपासून ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जाते.

या वर्षी तब्बल १३५ महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ रंगांच्या साड्या परिधान करून नऊ वेगवेगळे सेल्फी व रिल्स पाठविण्याची ही आगळीवेगळी स्पर्धा महिलांच्या प्रचंड प्रतिसादामुळे अधिकच रंगतदार ठरली.

रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पोटोबा महाराज प्रांगण येथे झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्याला हजारो वडगावकर नागरिकांनी उपस्थिती लावली. गगन डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर “जागरारा गरबा ग्रुप, पिंपरी”च्या आकर्षक गरबा नृत्याने वातावरण रंगून गेले.

Oplus_16908288

समारंभाला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच अर्चनाताई शहा, सायलीताई बोत्रे, वैशालीताई दाभाडे, रूपालीताई दाभाडे, अंजनाताई मुथा, रेखाताई भेगडे, अर्चनाताई म्हाळसकर, पूजाताई वहिले, ज्योतीताई काटकर या मान्यवर महिलांनीही उपस्थित राहून विजेत्यांचा गौरव केला.

नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी निवडलेल्या “नवदुर्गा विजेत्या” पुढीलप्रमाणे –

१. प्रेमा जमदाडे, २. सुनिता महाजन, ३. आमिषा पाथरवट, ४. अंजली कांबळे, ५. कविता पाटील, ६. निकिता जाधव, ७. अनिता मोरे, ८. शिल्पा पवार, ९. रूपाली काकडे.

या विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू, सोन्याची नथ, प्रमाणपत्र, चषक व मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले.

सेल्फी उत्तेजनार्थ विजेते: पुनम गायकवाड, वैशाली शिंदे, नीलम कदम, सारिका ओव्हाळ, मनीषा निकम, रूपाली जाधव, पूजा शिंदे, आरती खेंगले, सलोनी मोतीबने.

रिल्स उत्तेजनार्थ विजेते: दिपाली पाटील, कोमल खरात, सुनिता तरळकर, अश्विनी कांबळे, शुभांगी उदमले, वनिता होळकर, शिवानी कल्हाटकर, रिंकू पट्टेबहादूर, स्वाती पाटोळे.

रिल्स स्पर्धेतील प्रमुख विजेते:

🥇 प्रथम – किरण ढेरे

🥈 द्वितीय – विशाखा लोंढे

🥉 तृतीय – ममता दौंडे

या विजेत्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तू, वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी, पुष्पगुच्छ, चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.

वरील नवदुर्गांमधून सौ. सुनिता महाजन यांची “महादुर्गा विजेता 2025” म्हणून निवड करण्यात आली. पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद पटकावत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यांना फ्रिज, क्राऊन, चषक व पुष्पगुच्छ बक्षीस म्हणून देण्यात आले.

या स्पर्धेबाबत बोलताना सायली म्हाळसकर म्हणाल्या,

> “महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सहा वर्षांपूर्वी ‘मी दुर्गा बेस्ट सेल्फी आणि रिल्स कॉन्टेस्ट’ ही संकल्पना सुरू केली. आज हे रोपटे वडगाव शहरात वटवृक्षासारखे फुलले आहे. महिलांचा वाढता प्रतिसाद हीच आमची खरी प्रेरणा आहे.”

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाराष्ट्रातील नामांकित निवेदिका पूजाताई थिगळे यांनी केले. आयोजन समितीमध्ये सुषमा म्हाळसकर, आरती म्हाळसकर, शितल म्हाळसकर, प्रतीक्षा शिंदे, प्रणाली म्हाळसकर, जागृती राणे यांनी उत्साहाने जबाबदारी पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!