Homeसामाजिकनशा मुक्त भारत अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

पुणे : व्यसनमुक्त समाजाची उभारणी आणि तरुण पिढीला नशेच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत तसेच मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Oplus_16908288

या स्पर्धांमध्ये चित्रकला, वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धा यांचा समावेश असून, विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रबोधन करण्याचा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. समाजातील तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी अशा सर्जनशील माध्यमांचा प्रभावी वापर होईल, असा विश्वास समाजकल्याण विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे अधिष्ठाता, संचालक आणि प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयात या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Oplus_16908288

महाविद्यालयीन स्तरावर विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावरील अंतिम निवड प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून, विजेत्यांची नावे २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, पुणे येथे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या उपक्रमाबाबत माहिती देताना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले की,

“नशा मुक्त भारत अभियानाचा उद्देश केवळ व्यसन विरोधी प्रचार करणे नसून, तरुणांमध्ये सकारात्मक जीवनमूल्यांची जाणीव निर्माण करणे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी मानसिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम होतील आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावतील.”

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!