Homeराजकीयमावळ तालुक्यात पंचायत समिती आरक्षण जाहीर — महिलांना मोठे प्राधान्य

मावळ तालुक्यात पंचायत समिती आरक्षण जाहीर — महिलांना मोठे प्राधान्य

मावळ तालुक्यात पंचायत समिती आरक्षण जाहीर — महिलांना मोठे प्राधान्य

मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील पंचायत समितीच्या जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, या वेळी महिलांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य मिळाले आहे. एकूण दहा गटांच्या जागांसाठी झालेल्या या सोडतीत अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण घटक या तिन्ही प्रवर्गांचा समावेश आहे.

जाहीर झालेल्या आरक्षणाची यादी :

१) नाणे – अनुसूचित जमाती (महिला)
२) वराळे – सर्वसाधारण
३) इंदोरी – सर्वसाधारण
४) काळे – सर्वसाधारण (महिला)
५) कुसगाव बु. – सर्वसाधारण
६) काळ – सर्वसाधारण (महिला)
७) सोमाटणे – नागरिकांचा मागास प्रवर्ग
८) चांदखेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
९) खडकाळा – अनुसूचित जाती
१०) टाकवे बु. – सर्वसाधारण (महिला)

या आरक्षण सोडतीत तब्बल पाच जागा महिलांसाठी राखीव आल्या आहेत. त्यामुळे पंचायत समिती मावळमध्ये महिलांचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढत असतानाच ही संधी त्यांच्या नेतृत्वक्षमतेला अधिक बळ देणारी ठरणार आहे.

आरक्षण सोडतीनंतर आता तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि विरोधक यांच्यात चुरशीचा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुती असली तरी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना दिसू लागला आहे.

आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात हालचाली सुरू केल्या आहेत. गावागावांत बैठकांना, रणनीती आखणीला वेग आला असून, मतदारांमध्येही निवडणुकीची उत्सुकता दिसू लागली आहे.

पंचायत समिती मावळमध्ये जाहीर झालेल्या या आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, महिलांना मिळालेले प्राधान्य ही निवडणुकीतील प्रमुख ठळक बाब ठरणार आहे. आगामी काळात कोणत्या पक्षाचा झेंडा पंचायत समितीच्या इमारतीवर फडकणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!