
तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांचा पाऊस. अखेरच्या दिवशी १३२अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ५जण रिंगणात
तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक २०२५साठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी झालेला शेवटचा दिवस अक्षरशः राजकीय रणधुमाळीतच पार पडला. शहरातील निवडणूक कार्यालयाबाहेर सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली होती. ढोल-ताशे, घोषणाबाजी आणि राजकीय समूहांच्या उत्साही रॅलींमुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे तापमान उसळले होते.


अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल १३२अर्जांची नोंद झाली असून, केवळ २८ नगरसेवक पदांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरल्याने आगामी लढत चुरशीची आणि अनिश्चिततेने भरलेली राहणार आहे. अनेक प्रभागांमध्ये बहुमूल्य चेहरे समोर आल्याने आणि नव्या उमेदवारांनीही जोरदार तयारी केल्याने यंदाची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.


नगराध्यक्ष पदासाठी यंदा पाच जणांचा थरारक मुकाबला रंगणार असून, शहराचे राजकीय लक्ष या प्रमुख लढतीवर केंद्रीत झाले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये —
संतोष हरिभाऊ दाभाडे
किशोर छबुराव भेगडे
रंजना रघुनाथ भोसले
विशाल सतीश वाळुंज
सौरभ दाभाडे
या नावांचा समावेश असून, प्रत्येकाच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर दमदार शक्तिप्रदर्शन केले.


अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता छाननीचा टप्पा, त्यानंतर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आणि मग अधिकृत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. अर्जांचा वाढलेला आकडा आणि उमेदवारांचा जोश पाहता, यंदाची तळेगाव दाभाडे निवडणूक ही केवळ नियमित निवडणूक न राहता एक राजकीय महामुकाबला ठरणार, याबाबत मतदारांमध्येही चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















