
आमदार आमचा नसला तरी आमदाराचा बाप म्हणजेच देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत आहे. लोणावळ्यात सुरेखा जाधव यांचे प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य
लोणावळा :मावळ तालुक्यातील तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीचे वारे जोरात सुटले असून, त्यातही लोणावळा नगरपालिकेकडे संपूर्ण तालुक्याचे, अगदी राज्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष केंद्रीत झाले आहे. अशातच माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी राजकीय तापमान चांगलेच वाढवले आहे.


भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष आ. चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत जाधव म्हणाल्या : “मावळात आमचा आमदार नसला तरी आमदारांचा .. — देवेंद्र फडणवीस — आमच्यासोबत आहे. निधी कमी पडणार नाही.” हे विधान होताच मावळात कुजबुज निर्माण झाली.
राजकीय जाणकारांच्या मते, हे विधान फक्त गर्विष्ठच नव्हे तर आमदार सुनील शेळके यांना जाहीरपणे कमी लेखण्याचा प्रयत्न होता. जाधवांकडून सतत ‘एकेरी उल्लेख’, भाषेचा स्तर घसरत असल्याची टीका
मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्यावर जाधव यांनी गेल्या काही दिवसांत सातत्याने सडकून टीका केली आहे. त्यातही भाषणात वापरलेली अवमानकारक भाषा, वैयक्तिक उल्लेख आणि टोमणे—यामुळे जाधवांच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


“पराभवाची चाहूल लागली की नेत्यांची भाषा बिथरते; लोणावळ्यात तेच दिसत आहे.” युतीच्या आदेशानंतरही जाधवांची ‘स्वतंत्र’ चाल भाजप कार्यकर्त्यांत नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणावळ्यातही इतर नगरपालिकांप्रमाणे युती करण्याचे संकेत दिले होते. मात्र त्याची पर्वा न करता जाधवांनी स्वतःचा स्वतंत्र मार्ग स्वीकारला. यामुळे भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे.
भाजपचे काही उमेदवारच राष्ट्रवादी उमेदवारांना पाठिंबा देताना दिसत आहेत! यामुळे जाधवांच्या ‘सत्ताकारणातील गणिताला’ मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. लोणावळ्यातील सुज्ञ नागरिकांमध्येही सुरेखा जाधवांच्या भाषेबद्दल असंतोष दिसतो.


स्त्री असल्याचा कवच असल्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना तितकं प्रत्युत्तर मिळत नाही. त्यामुळेच त्या अधिक आक्रमक झाल्या आहेत.”शेळके यांना जोरदार प्रतिसाद त्यामुळे टीकेचा पारा वाढला?
लोणावळा नगरपालिकेत आमदार सुनील शेळके यांना नागरिकांकडून मिळत असलेला ऊर्जादायी प्रतिसाद आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच इतर पक्षांकडून मिळालेला उघड पाठिंबा यामुळेच जाधव अधिकच आक्रमक झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

लोणावळ्यातील सध्याची परिस्थिती तीन शब्दांत सांगायची तर अस्थिरता — आक्रमकता — आणि अंतर्गत बंड जाधवांची आक्रमक भाषा, युतीकडे दुर्लक्ष, पक्षातील नाराजी आणि शेळके यांच्या बाजूने वाढता कल— या सर्वामुळे लोणावळ्यातील निवडणुकीची लढत आता तिखट, तापलेली आणि अनिश्चित बनली आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















