Homeताज्या बातम्याद्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू

द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू

द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू

ताजे(मावळ) : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ताजे पेट्रोल पंपाजवळ रविवारी पहाटे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरचालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडे येणाऱ्या कंटेनरचे नियंत्रण अचानक सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला घसरत गेला. याचवेळी मुंबईकडे जाणारी मोटारकार त्याच मार्गावरून येत होती. कंटेनरने अचानक दिशाच बदलल्याने मोटारकारला जोरदार धडक बसली. धडकेत मोटारचे पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला.

या अपघातात कंटेनरचालक अनुराग जगदीश गडवा(रा. चक्कर उत्तर प्रदेश) आणि मोटारीतील प्रवासी विवेक सुरेंद्र प्रतापसिंह (वय ३०, रा. फैजाबाद, उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारीतील चालक शुभम शुक्ल (वय ३२, रा. खारघर, नवी मुंबई) तसेच प्रवासी ऋतुराज परमंहस जसवाल (वय ३२, रा. तुर्भे, मुंबई), अवधेश यादव (वय ३३) आणि कंटेनरमधील राहुल राजेंद्र यादव (वय २१, रा. वाराणसी) गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीने उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेह तळेगाव दाभाडे येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहेत.

अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!