Homeमहत्त्वाचेतळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा निष्काळजीपणा! दोन वर्षं जुना विसर्जन हौद ‘डेंगू प्लांट’ बनला

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा निष्काळजीपणा! दोन वर्षं जुना विसर्जन हौद ‘डेंगू प्लांट’ बनला

तळेगाव दाभाडे : शहरात विकासाच्या नावाने लाखो रुपयांचे फुगवलेले दाखले मिरवणारी तळेगाव दाभाडे नगर परिषद, प्रत्यक्षात मात्र काही फुटांवर उभ्या असलेल्या समस्येकडे कानाडोळा करत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. नथूभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळेजवळ नगरपरिषदेनं दोन वर्षांपूर्वी पक्क्या स्वरूपात बांधलेला कृत्रिम विसर्जन हौद आज ‘डेंगू-मलेरिया केंद्र’ बनला असून प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे.

गणेश विसर्जनासाठी बांधलेला हा हौद वर्षभर रिकामा करण्याची तर सोय दूरच, पण हौदातील पाणी काढण्याची तसदीदेखील नगरपरिषदेनं आजपर्यंत घेतलेली नाही. परिणामी या स्थिर पाण्यात डेंगू आणि मलेरियाचे डास मोठ्या प्रमाणात वाढत असून परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

या हौदापासून अवघ्या पन्नास फूट अंतरावर शाळेचे मैदान आहे, जिथे रोज शेकडो विद्यार्थी खेळतात. जवळच जुनी नगरपरिषद इमारत, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि घनदाट रहिवासी वस्त्या आहेत. एवढ्या महत्त्वाच्या जागेत असलेला डासांचा उगमस्थान ठरलेला हौद नगरपरिषदेला दिसत नाही, हीच खरी कमाल! हाकेच्या अंतरावर असलेल्या इमारतीत बसलेले अधिकारी मात्र ‘काहीच माहिती नाही’च्या धाटणीने मौनव्रत पाळताना दिसतात.

नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही हौद कोरडा करण्याची मागणी धुडकावण्यात येत असल्याचा आरोप आहे. शहरात डेंगूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाचा हा निष्काळजीपणा गंभीर प्रश्न निर्माण करतो.

नागरिकांचा सवाल एकच — “हौद भरणे सोपे, पण डासांनी भरलेला हौद रिकामा करायला एवढी कसरत कशाला?”

नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ कृती करीत हौद पूर्णपणे कोरडा करण्याची मागणी जोर धरत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!