Homeसामाजिकटाकवे बुद्रुकमध्ये आरोग्याचा प्रकाशोत्सव .मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

टाकवे बुद्रुकमध्ये आरोग्याचा प्रकाशोत्सव .मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

टाकवे बुद्रुकमध्ये आरोग्याचा प्रकाशोत्सव .मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

टाकवे बुद्रुक : ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवेला चालना देणाऱ्या उपक्रमांतर्गत टाकवे–नाणे जिल्हा परिषद गटातील महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या पुढाकारातून आणि आमदार सुनिल (आण्णा) शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, गटातील कमीत कमी २०० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी भोयरे (कशाळ, किवळे) येथे प्राथमिक तपासणी शिबिर होणार आहे. त्यानंतर गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी टाकवे बुद्रुक (बेलज, फळणे) येथे मुख्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत जिल्हा परिषद शाळा, टाकवे बुद्रुक येथे नागरिकांची सविस्तर नेत्रतपासणी करण्यात येणार आहे.

या शिबिराची खास बाब म्हणजे तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत सर्व सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ने-आण करण्याची जबाबदारी आयोजकांकडून घेतली जाणार असून, कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार रुग्णांवर येणार नाही. त्यामुळे डोळ्यांचे आजार असलेल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात माहिती देताना डॉ. अशोक विठ्ठल दाते यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील अनेक नागरिक आर्थिक अडचणींमुळे वेळेवर नेत्रतपासणी किंवा शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. अशा गरजू रुग्णांपर्यंत दर्जेदार आणि विश्वासार्ह उपचार पोहोचवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. कोणताही खर्च न करता नागरिकांनी निर्धास्तपणे पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय स्पर्श हॉस्पिटलच्या सहकार्याने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मणका, मेंदू, हाडांचे आजार, मुतखडा, स्त्रीरोग तसेच सर्वसाधारण शस्त्रक्रियांबाबत मोफत तपासणी व ठराविक आजारांवर मोफत ऑपरेशनची सुविधाही या शिबिरात उपलब्ध राहणार आहे.

हा उपक्रम डॉ. अशोक विठ्ठल दाते (एम.बी.बी.एस., एम.एस.), संचालक, पार्वती नेत्रालय व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, सर्व आजी-माजी पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ मंडळी आणि ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक यांच्या सहकार्याने तो यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

शिबिरासाठी सहभागी होणाऱ्या नागरिकांचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून, ऑपरेशनसाठी आधारकार्ड व रेशनकार्ड अनिवार्य आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!