Homeराजकीयश्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान

श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान

श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान

तळेगाव दाभाडे : शहराच्या विकासासाठी नवे स्वप्न आणि नवी दिशा घेऊन नगरपरिषदेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविकांचा भव्य सन्मान सोहळा श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने उत्साहात पार पडला. लोकशाहीच्या बळकटीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची असून, नव्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या सन्मान सोहळ्यात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्यासह नगरसेवक व नगरसेविकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हा सत्कार संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, सल्लागार बबनराव भोंगडे, संस्थेचे आधारस्तंभ नगरसेवक संतोष भेगडे, अध्यक्ष शरद भोंगडे, माजी अध्यक्ष राहुल पारगे, संचालक अंकुश आंबेकर, उपाध्यक्ष समीर भेगडे, खजिनदार अमित भसे, संचालक प्रवीण मुन्हे, अरविंद गद्रे, विजय भेगडे, शंकर भेगडे, दत्तात्रय भेगडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भोमे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी नगरसेवक संतोष भेगडे, सुदाम शेळके, सत्यम खांडगे, सिद्धार्थ दाभाडे, मदन नाटेकर तसेच नगरसेविका संगीता खळदे, कमलताई टकले, सोनाली दरेकर, आशाताई भेगडे, भारती धोत्रे, शैलजा काळोखे, स्नेहा खांडगे, मनीषा म्हाळसकर, हेमलता खळदे, अश्विनी शेळके व ऋतूजा भगत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याच कार्यक्रमात संस्थेचे संचालक प्रवीण मुन्हे यांची तळेगाव स्टेशन विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मार्गदर्शनपर भाषणात संस्थापक बबनराव भेगडे यांनी लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक, लोकाभिमुख आणि जबाबदार प्रशासन राबवावे, असे आवाहन केले. विकासकामांमध्ये सातत्य, प्रामाणिकपणा आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास शहराचा सर्वांगीण विकास निश्चितच साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद भोंगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल पारगे यांनी केले. या सत्कार समारंभ प्रसंगी अनेक नागरिक व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!