Homeशहरतळेगाव स्टेशन तलावाच्या समस्यांवर नगराध्यक्षांची थेट पाहणी

तळेगाव स्टेशन तलावाच्या समस्यांवर नगराध्यक्षांची थेट पाहणी

तळेगाव स्टेशन तलावाच्या समस्यांवर नगराध्यक्षांची थेट पाहणी

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरातील तळेगाव स्टेशन परिसरातील तलाव व त्याभोवतालच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची दखल घेत नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी सोमवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सकाळी व सायंकाळी आरोग्याच्या दृष्टीने फिरण्यासाठी या तलाव परिसरात येत असल्याने या भागातील अडचणी तातडीने सोडविण्याची गरज निर्माण झाली होती.

या पाहणीदरम्यान तलावाभोवती असलेल्या वॉकिंग ट्रॅकवरील खड्डे, ठिकठिकाणी खराब झालेला मार्ग, साचलेला कचरा तसेच अपुऱ्या स्वच्छतेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची नगराध्यक्षांनी सविस्तर पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेसह आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता संबंधित ठेकेदार व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्ती, स्वच्छता व सुशोभीकरणाची कामे सुरू करण्याचे स्पष्ट आदेश नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी दिले.

यावेळी CRPF परिसरातून येणारे सांडपाणी थेट तलावात मिसळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असून पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्षांनी संबंधित विभागाला सांडपाण्यावर तातडीने उपाययोजना करून ते तलावात जाणार नाही, यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, गावभागातील ऐतिहासिक तलावाची स्थितीही चिंताजनक असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. या तलावात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्याने दुर्गंधी पसरली असून मच्छरांची पैदास वाढली आहे. आजही सांडपाणी या ऐतिहासिक तलावात थेट सोडले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष संतोष दाभाडे हे या ऐतिहासिक तलावाच्या जतन व संवर्धनासाठी लक्ष देणार का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.

प्रतिनिधी= गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!