Homeमहत्त्वाचेभंडारा डोंगराच्या पायथ्याशी भक्तीचा महासागर; अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायणाचा भव्य...

भंडारा डोंगराच्या पायथ्याशी भक्तीचा महासागर; अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायणाचा भव्य सोहळा

भंडारा डोंगराच्या पायथ्याशी भक्तीचा महासागर; अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायणाचा भव्य सोहळा

इंदोरी(मावळ) मावळ तालुक्यातील श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी येत्या २२ ते ३१ जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा भव्य आणि दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने होणाऱ्या या सोहळ्याची माहिती मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सोहळ्याचे संयोजक ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम आणि ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी दिली.

यावेळी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे विश्वस्त माणिकमहाराज मोरे, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, बाळासाहेब जांभुळकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर व भक्तगण उपस्थित होते.

भंडारा डोंगराच्या पायथ्याशी दरवर्षी होणारा हा वैभवी धार्मिक सोहळा यंदा विशेष ऐतिहासिक ठरणार असून राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होणार आहेत. सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात येणार असून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान मावळ, श्रीक्षेत्र घोरवाडेश्वर डोंगर व श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर या संस्थानांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या सोहळ्यानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव, संत नामदेव महाराज, संत जनाबाई यांच्यासह १४ संतांचा ६७५ वा समाधी सोहळा, संत सावता महाराजांचा ७७५ वा जन्मोत्सव, संत जनार्दनपंत देशपांडे देवगिरी यांचा ४५० वा संजीवन समाधी सोहळा, तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा सदेह वैकुंठ गमन दिन आणि तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांचा ३७५ वा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

गुरुवार, २२ जानेवारी रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत श्रीक्षेत्र देहू ते भंडारा डोंगर पायथा दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत ३७५ धर्मध्वजधारी, कलशधारी, तुलसीधारी, कीर्तनकार, टाळकरी, मृदुंग सेवक, ब्रह्मविणाधारी व चोपदार सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे तुकाराम नावाच्या ३७५, ज्ञानेश्वर नावाच्या ७५०, नामदेव नावाच्या ६७५ तर जनाबाई नावाच्या ६७५ महिला भक्त सहभागी होणार आहेत.

सोहळ्यात दररोज पहाटे चार ते सहा काकडा, सकाळी सहा ते अकरा गाथा व ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी अकरा ते साडेबारा कीर्तन, दुपारी एक ते तीन भोजन, सायंकाळी हरिपाठ, संत चरित्र कथा, सायंकाळी सहा ते आठ कीर्तन, रात्री भोजनानंतर हरी जागर असा अखंड भक्तीमय कार्यक्रम सुरू राहणार आहे.

सोहळ्याची ठळक वैशिष्ट्ये

गाथा पारायणात ५ हजार गाथावाचक, १ हजार टाळकरी, प्रतिदिन २५ मृदुंग वादक सहभागी होणार असून २४ तास ज्ञानदेव-तुकाराम भजन प्रहर चालणार आहे. मुळशी तालुक्यातर्फे एक लक्ष भाविकांना पुरणपोळीचे भोजन देण्यात येणार आहे. दररोज दुपारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित कथा वाचन होणार आहे. २८ जानेवारी रोजी डॉ. रामचंद्र देखणे कला प्रबोधिनीतर्फे बहुरूपी भारूडाचा विशेष कार्यक्रम होणार आहे.

या सोहळ्यात राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा लाभणार आहे. तसेच संतांच्या विचारांनुसार पर्यावरण सप्ताह पाळण्यात येणार असून संत तुकाराम महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त ३७५ देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश कीर्तनांतून देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

भक्ती, सेवा, संतविचार आणि पर्यावरण जतन यांचा संगम असलेला हा सोहळा वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

प्रतिनिधी.गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!