Homeसामाजिककरंजगावात पत्रकार दिनी सामाजिक उपक्रम २६ विद्यार्थ्यांना सायकल, १०० आदिवासींना ब्लँकेट वाटप

करंजगावात पत्रकार दिनी सामाजिक उपक्रम २६ विद्यार्थ्यांना सायकल, १०० आदिवासींना ब्लँकेट वाटप

करंजगावात पत्रकार दिनी सामाजिक उपक्रम २६ विद्यार्थ्यांना सायकल, १०० आदिवासींना ब्लँकेट वाटप

करंजगाव : मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार दिन करंजगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण, मानवता आणि सेवाभाव या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल वाटप व आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट वितरणाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

पत्रकार दिनानिमित्त मावळ तालुक्यातील करंजगाव येथील प्राथमिक शाळेतील २६ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले, तर १०० आदिवासी महिला व पुरुषांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचत समाजप्रबोधनाचे कार्य कसे केले, याची आठवण करून देत त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पसायदान संस्थेचे राजेश बद्रे, संजीव येलगे, वर्षा येलगे, रत्नाकर जाधव, अभा गुप्ता, सागर काकडे उपस्थित होते.

यावेळी पोलीस पाटील राजश्री तंबोरे, सरपंच उज्वला पोटफोडे, माजी सरपंच कौशल्या पवार, माजी सरपंच शरद सोरकाते, उपसरपंच नवनाथ ठाकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग गोडे, ग्रामसेवक चंद्रकांत मोरे, योगेश माझिरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश साबळे, संतोष पवार, अशोक गोडे, सुदाम कुडले, कांताराम दहातोंडे, रवींद्र पवार, सुरेश वाघमारे, काळूराम वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, साधू पोटफोडे, संदीप पोटफोडे, विजय खेंगले, सोमनाथ पोटफोडे, जयश्री कुडले, सविता मिसाळ, आरती साठे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेखा पोटफोडे, काजल साबळे, पुनम ठाकर, सुषमा शेलार, तुकाराम भालशिंगे, पुनम पोटफोडे, सतीश कांबळे, सुरेश उंडे उपस्थित होते.

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष विशाल विकारी, उपाध्यक्ष भारत काळे, सचिव रामदास वाडेकर, प्रकल्प प्रमुख गणेश विनोद, ज्येष्ठ सल्लागार ज्ञानेश्वर वाघमारे, खजिनदार संकेत जगताप, विशाल कुंभार, शिवानंद कांबळे, प्रफुल्ल ओव्हाळ, सागर शिंदे, प्रशांत पुराणिक, रेश्मा फडतरे, संजय हुळावळे यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पसायदान संस्थेचे संजीव येलगे यांनी सायकल चालविण्याचे आरोग्यविषयक फायदे सांगून पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक भान आणि पत्रकारितेच्या मूल्यांचा संगम साधणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला.

हा कार्यक्रम पसायदान संस्था व मावळ तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!