Homeसामाजिकदिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

दिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

दिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वडगाव मावळ : वडगाव मावळ येथील दिग्विजय मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष ओंकार नितीन भांगरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिरास स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श यावेळी पाहायला मिळाला.

या रक्तदान शिबिराचे हे तिसरे वर्ष असून यंदा तब्बल ४९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. पिंपरी येथील पिंपरी–चिंचवड ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. यासोबतच चिंचवड येथील ईशा नेत्रालय यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेतला.

या शिबिराचे उद्घाटन वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अबोली ढोरे व उपनगराध्यक्ष सुनील ढोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अजय म्हाळसकर, विशाल वहिले, अजय भवार, सुनिता ढोरे, आकांक्षा वाघवले, पुनम भोसले यांनी उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

तसेच ग्रामदैवत पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उद्योजक गणेश भेगडे, गणेश वहिले, विकी भोसले, दिलीपजी भिलारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत घुमटकर, प्रसाद भेगडे, श्रीधर भेगडे, केतन पोते, चेतन हुले, ऋषिकेश भोंडवे, साईराज खेंगले, यश नखाते, अजय देडे, आदित्य भेगडे, साई भांगरे, श्रेयस दरेकर, ओम खेंगरे, दिनेश म्हाळसकर, ओंकार घारे, अजय जाधव व अथर्व खेंगले यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी बोलताना शिबिराचे मुख्य आयोजक ओंकार भांगरे म्हणाले,

“आपला वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा क्षण न राहता तो कोणाच्या तरी जीवनासाठी उपयोगी ठरावा, या भावनेतून दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. समाजसेवा हाच माझ्या वाढदिवसाचा खरा अर्थ आहे.”

सामाजिक भान जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दिग्विजय मित्र मंडळाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक संदेश जात असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!