Homeमहत्त्वाचेपुणे ग्रामीण पोलिसांकडून वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रणासाठी प्रथमच लेझर स्पीड कॅमेऱ्यांची...

पुणे ग्रामीण पोलिसांकडून वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रणासाठी प्रथमच लेझर स्पीड कॅमेऱ्यांची तैनातीः सहा महिन्यांचा पायलट प्रकल्प सुरू

पुणे ग्रामीण पोलिसांकडून वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रणासाठी प्रथमच लेझर स्पीड कॅमेऱ्यांची तैनातीः सहा महिन्यांचा पायलट प्रकल्प सुरू

 

पुणे, ८ मार्च २०२६ – वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा बळकट करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा प्रथमच वापर करत वेग अंमलबजावणीचा पायलट प्रकल्प सुरू केला. ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनीशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (BIGRS) अंतर्गत भागीदार असलेल्या ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप (GRSP) यांच्या सहकार्याने राबविण्यात येणारा हा पायलट प्रकल्प पुणे जिल्ह्यातील लोणावळा व वडगाव मावळ पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात शनिवारपासून सुरू करण्यात आला आहे.

 

टूकॅम II स्पीड कॅमेरे (TruCam II Speed Camera) ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिपचे वरिष्ठ रोड पोलिसिंग सल्लागार श्री. पॉल सिमकॉक्स यांच्या वतीने पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक श्री. संदीप सिंग गिल यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले. या प्रकल्पाअंतर्गत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तसेच पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी तीन टूकॅम II स्पीड कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. हा उपक्रम रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्याच्या आणि एकूण रस्ते सुरक्षितता सुधारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

 

पुणे ग्रामीण रस्ते सुरक्षा अहवाल २०२२-२०२३ नुसार, २०२२ आणि २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील एकूण प्राणघातक अपघातांपैकी ५७ टक्के अपघात पुणे ग्रामीण क्षेत्रात नोंदवले गेले असून त्यामध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वार आणि पादचारी बाधित झाले आहेत. अहवालानुसार, २०२३ मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात ९८३ रस्ते अपघातांमुळे मृत्यू नोंदवले गेले, जे मागील वर्षाच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढले आहेत. या आकडेवारीतून वेगमर्यादा उल्लंघनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होते.

 

यावेळी बोलताना श्री. गिल यांनी नमूद केले की, पुणे ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्यांमध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वार आणि पादचारी यांचा समावेश आहे. अतिवेग हा रस्ते अपघातांच्या प्रमुख कारणांपैकी एक असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

“दुर्दैवाने, पुणे ग्रामीण भागात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या मार्गांवर वाढीव अंमलबजावणीद्वारे अतिवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा पायलट प्रकल्प राबविण्यात येत आहे. जनजागृती मोहिमेच्या पाठबळासह ही अंमलबजावणी रस्ते अपघात तसेच त्यातून होणारे मृत्यू आणि जखमींची संख्या कमी करण्यास मदत करेल,” असे श्री. गिल यांनी सांगितले.

 

हे स्पीड कॅमेरे दिवस तसेच रात्री अत्यंत अचूक वेग मोजमाप करण्यासाठी डिझाइन करण्यात आले असून येणाऱ्या आणि दूर जाणाऱ्या दोन्ही प्रकारच्या वाहनांचा ३२० किमी/तास वेगापर्यंतचा अतिवेग नोंदविण्याची क्षमता त्यांच्यात आहे. हे लेड़ार स्पीड कॅमेरे अंमलबजावणीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडून हातात धरून वापरता येतात, ट्रायपॉडवर बसवता येतात किंवा पोलिस वाहनांमध्ये स्थापित करूनही वापरता येतात, म्हणून वाहतूक नियमांचे उल्लंघन ओळखणे व नोंदविणे अधिक प्रभावीपणे शक्य होते.

 

हे स्पीड कॅमेरे उच्च-रिझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ नोंदविण्याची क्षमता प्रदान करतात, ज्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट पुरावे संकलित करणे शक्य होते. ही प्रगत उपकरणे सीट बेल्टचा वापर न करणे, हेल्मेट न घालणे तसेच वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे अशा इतर रस्ते सुरक्षा नियमभंगांचेही निदान करण्यास सक्षम आहेत. यामुळे अंमलबजावणीचा व्याप वाढून एकूण रस्ते सुरक्षितता अधिक बळकट होण्यास मदत होते.

 

मे २०२५ मध्ये, ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिपतर्फे पुणे ग्रामीणच्या सुमारे ४० पोलिस अधिकाऱ्यांना लेझर स्पीड कॅमेऱ्यांच्या वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले. श्री. पॉल सिमकॉक्स यांनी घेतलेल्या आठवडाभर चाललेल्या प्रशिक्षणामध्ये कॅमेऱ्यांची मांडणी, प्रत्यक्ष क्षेत्रातील अंमलबजावणी आणि पुरावा व्यवस्थापन यांसह तांत्रिक बार्बीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये अतिवेग अंमलबजावणी तसेच रस्त्याच्या कडेला सुरक्षित कार्यवाहीवर आधारित दोन दिवसांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सत्र आयोजित करण्यात आले. अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी लोणावळा आणि वडगाव-मावळ पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नोव्हेंबर २०२५

 

आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये पुढील प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली.

 

“ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनीशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (BIGRS) अंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांबरोबर पुराव्यावर आधारित वेग अंमलबजावणी पायलट योजनेची अंमलबजावणी करताना ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप (GRSP) ला अभिमान वाटतो. अतिवेगावर नियंत्रण ठेवणे हे प्राणघातक आणि गंभीर दुखापतींचे अपघात कमी करण्यासाठी सर्वाधिक प्रभावी उपायांपैकी एक आहे. डेटावर आधारित कॅमेरा-अंमलबजावणीची ही पद्धत पुण्यात अधिक सुरक्षित रस्ते निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. हा संयुक्त उपक्रम रस्ते सुरक्षेशी संबंधित सर्व भागीदारांच्या जीव वाचविण्याच्या आणि राज्यातील प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या सामूहिक बांधिलकीचे प्रतीक आहे,” असे श्री. सिमकॉक्स यांनी सांगितले.

 

प्रगत तंत्रज्ञान आणि प्रभावी अंमलबजावणी धोरणाच्या माध्यमातून हा पायलट प्रकल्प विशेषतः उच्च-जोखमीच्या भागांमध्ये रस्ते सुरक्षितता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करतो. पायलटदरम्यान संकलित होणाऱ्या आकडेवारीच्या आधारे अंमलबजावणीची पद्धत अधिक परिष्कृत करण्यात येईल आणि पुणे ग्रामीण पोलिसांना त्यांच्या कार्यक्षेत्रात रस्ते सुरक्षा उपाययोजना व्यापक स्तरावर राबविण्यास मदत होईल.

 

ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनीशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी हा उपक्रम जगातील आघाडीच्या रस्ते सुरक्षा

संस्थांसोबत भागीदारीत रस्ते सुरक्षा उपक्रमांची अंमलबजावणी करतो आणि संबंधित देशांतील सरकारी तसेच स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधतो. BIGRS हा उपक्रम परिणामाभिमुख दृष्टिकोनावर भर देतो तसेच प्रगतीचे सातत्याने मूल्यांकन करण्यासाठी उच्च दर्जाच्या मॉनिटरिंग व मूल्यांकन यंत्रणांचा वापर करतो. अधिक माहितीसाठी भेट द्याः

 

ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप (GRSP) ही ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनीशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टीची अंमलबजावणी करणारी भागीदार संस्था आहे. ही संस्था निम्न व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील पोलिस यंत्रणांसोबत काम करून जागतिक दर्जाच्या रस्ते सुरक्षा उपाययोजना लागू करता येतील अशा क्षेत्रांची ओळख करून देते. यामध्ये अंमलबजावणी, जनजागृती, कायदेविषयक धोरण विकास तसेच संवाद यांसारख्या क्षेत्रांत पोलिस नेतृत्व आणि कार्यकर्त्यांसोबत जवळून सहकार्य केले जाते.

 

यावेळी डी वाय एस पी गजानन टोंणे कांचन आवटे वडगाव पोलीस स्टेशनचे पी आय अभिजित देशमुख पी आय शंकर पाटील शितल डोईजड कैलास कदम पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद
error: Content is protected !!