तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक तलावाची स्वच्छता करण्याची मागणी
तळेगाव दाभाडे : शहरातील ऐतिहासिक असणारा बनेश्वर महादेव मंदिरासमोरील तलावात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे या तलावातील पाणी हे प्रदूषित असल्याने दरवर्षी या तलावात हजारो माशांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे हा तलाव स्वच्छ करावा अशी मागणी मंदिरात येणाऱ्या भाविकांनी केली आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे राबविण्यात येणारी माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी.जल.वायु. अग्नि आणि आकाश यांचा समावेश होतो त्यामध्ये जल(पाणी) यामध्ये पाण्याचा योग्य वापर. पाण्याचे व्यवस्थापन व पाण्याचा पुनर्वापर इत्यादी विषयी काम करता येतात. तरी तळेगाव दाभाडे नगर परिषदेने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत या ऐतिहासिक तलावाची स्वच्छता करावी.व तलावात कारंजे उभारावे.
प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे.




















