Homeसामाजिकअर्ध्या गुंठ्यात कामशेत पोलीस स्टेशन — अधिकारी व नागरिकांची गैरसोय! सुसज्ज पोलीस...

अर्ध्या गुंठ्यात कामशेत पोलीस स्टेशन — अधिकारी व नागरिकांची गैरसोय! सुसज्ज पोलीस स्टेशन केव्हा होणार?

अर्ध्या गुंठ्यात कामशेत पोलीस स्टेशन — अधिकारी व नागरिकांची गैरसोय! सुसज्ज पोलीस स्टेशन केव्हा होणार?

कामशेत (ता. मावळ) : मावळ तालुक्यातील कामशेत हे पवन मावळ व नाणे मावळ चे प्रवेश द्वार आणि व्यापारासाठी ओळखले जाणारे गाव असले, तरी येथील पोलीस स्टेशनची अवस्था मात्र अत्यंत दयनीय आहे. केवळ अर्ध्या गुंठ्याच्या जागेत कार्यरत असलेले हे पोलीस स्टेशन गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी आणि नागरिक दोघांसाठीही त्रासदायक ठरत आहे. वाढते नागरीकरण, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण. वाढती गर्दी या सर्वच पार्श्वभूमीवर सुसज्ज पोलीस स्टेशनची गरज आता तीव्रतेने भासू लागली आहे.

सध्याच्या इमारतीत ना पुरेशी जागा आहे, ना आवश्यक सुविधा. चौकशी कक्ष, जबाब नोंदविण्यासाठीची खोली, महिला तक्रारदारांसाठी स्वतंत्र कक्ष किंवा विश्रांतीगृह—या मूलभूत सोयींचाही अभाव आहे. केवळ काही खुर्च्या, एक लहान कार्यालयीन टेबल आणि तुटपुंजे साहित्य यावरच सर्व कामकाज चालते. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अल्प जागेतच आपले दैनंदिन कामकाज पार पाडत आहेत. त्यातच नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते, तर कागदपत्रांची व्यवस्था करण्यासाठीही जागेची मोठी कोंडी जाणवते.

“पोलीस स्टेशनच्या जागेअभावी कामकाजावर थेट परिणाम होतो. चौकशी दरम्यान गोपनीयता राखणे अवघड जाते. नागरिकांच्या सोयीसाठी योग्य इमारत मिळणे ही आता काळाची गरज आहे,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

कामशेत हे मावळ तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे तसेच लोणावळा परिसर आणि अनेक पर्यटनस्थळे जवळ असल्याने या भागात दिवसेंदिवस वर्दळ वाढते आहे. गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कामशेत पोलीस ठाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ४३ गावांचा कारभार याच अर्धा गुंठे जागेतून पाहिला जातो परंतु उपलब्ध जागा आणि साधनसामग्री अत्यंत मर्यादित असल्याने या जबाबदाऱ्यांवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि सामाजिक संस्था यांनी वारंवार नवीन इमारतीची मागणी केली आहे. काही वर्षांपूर्वी नवीन इमारतीसाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र ती अद्याप कागदोपत्रीच आहे. “वाढत्या लोकसंख्येनुसार पोलीस दलाला बळकटी मिळणे अत्यावश्यक आहे. मात्र सुविधा नसल्याने पोलीस अधिकारीही अडचणीत येतात. नागरिकांना सुरक्षिततेची भावना यावी, तर योग्य इमारत उभी राहणे अत्यावश्यक आहे,” असे कामशेतमधील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सांगतात.

या संदर्भात संबंधित विभागाने तत्काळ पावले उचलण्याची मागणी होत आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नवीन जागेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती मिळते. मात्र त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून काम सुरू होण्यासाठी अजूनही प्रतीक्षा सुरू आहे.

कामशेतसारख्या वाढत्या नगरामध्ये केवळ अर्ध्या गुंठ्याच्या जागेत पोलीस स्टेशन चालवावे लागणे हे प्रशासनाच्या नियोजनातील गंभीर त्रुटी मानली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पोलीस दलाच्या कामकाजासाठी सुसज्ज इमारत उभारणे ही केवळ गरज नाही, तर तत्काल आवश्यकता आहे. आता सर्वांचे लक्ष प्रशासन या दिशेने केव्हा पाऊल उचलते याकडे लागले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!