Homeराजकीयएकाच नोटरीचे दोन अर्ज, दोन वेगळे निकाल! तळेगाव दाभाडे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयावर...

एकाच नोटरीचे दोन अर्ज, दोन वेगळे निकाल! तळेगाव दाभाडे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह ?

एकाच नोटरीचे दोन अर्ज, दोन वेगळे निकाल! तळेगाव दाभाडे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह ?

तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये नामनिर्देशनपत्र छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या परस्परविरोधी निकालांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक ११ ‘ब’ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले मयूर ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या नामनिर्देशनपत्राला ‘नोटरीकडून योग्यरीत्या अभिसाक्षांकित करण्यात आलेले नाही’ या कारणावरून अवैध ठरवण्यात आले. तर अगदी त्याच नोटरीकडून केलेल्या, आणि स्वरूपाने एकसारख्या असलेल्या, शितल मयूर पिंगळे यांच्या अर्जास प्रभाग ११ ‘अ’ मधून वैधता देण्यात आली.

मयूर पिंगळे यांनी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या छाननीवेळी सादर केलेल्या शपथपत्र/स्वयंघोषणापत्रावर नोटरीची मोहर स्पष्टपणे उमटलेली असली तरी नोटरीकडून अभिसाक्षांकित स्वाक्षरी नसल्याचे नमूद करून त्यांचा अर्ज नियमबाह्य ठरवण्यात आला. छाननी अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली. विशेष म्हणजे, निवडणुकीत इतर अनेक उमेदवारांनीही हाच स्वरूपाचा दस्तऐवज सादर केलेला असून अनेकांच्या अर्जांवर त्याच प्रकारचे नोटरी तपशील आढळत आहेत.

याच प्रक्रियेत, मयूर पिंगळे यांच्या पत्नी असलेल्या शितल मयूर पिंगळे यांनी प्रभाग ११ ‘अ’ मधून अर्ज दाखल केला होता. दोघांचेही शपथपत्र एकाच नोटरीकडून तयार झालेले आणि त्यावरील दस्तऐवजाची रचना व स्वरूप एकसारखे असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये स्पष्ट होते. मात्र, मयूर पिंगळे यांचा अर्ज अवैध तर त्यांच्या पत्नी शितल पिंगळे यांचा अर्ज वैध—असा पूर्णपणे विरोधाभासी निकाल एकाच अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्यामुळे निवडणूक व्यवस्थेतील सातत्य, वस्तुनिष्ठता आणि पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक पातळीवर याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. समान दस्तऐवजांबाबत दोन भिन्न निर्णय कसे दिले गेले? नोटरीची एकसारखी प्रक्रिया असूनही एका उमेदवाराचा अर्ज ग्राह्य व दुसऱ्याचा अयोग्य—यामागील निकष काय? या प्रश्नांची उत्तरे अद्याप निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेली नाहीत.

निवडणूक प्रक्रियेतील अशा विसंगतीमुळे मतदार आणि उमेदवारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम वाढत आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या संपूर्ण प्रकियेत काटेकोरता आणि नियमांचे एकसमान पालन झाले आहे का, याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि उमेदवारांकडून पुढे येण्याची शक्यता आहे.

या परस्परविरोधी निर्णयामुळे ‘एकाच नोटरी, एकच कागदपत्र—मग दोन वेगळे निकाल का?’ हा सवाल आता तळेगावच्या राजकीय वातावरणात केंद्रस्थानी आला आहे.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!