कातवीत भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचारदौरा; मृणाल म्हाळसकर व दिनेश ढोरे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वडगाव नगरपंचाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांनी प्रभाग क्रमांक २ चे उमेदवार दिनेश ढोरे यांच्यासह कातवी परिसरात प्रचार दौरा केला. या दौऱ्यास स्थानिक नागरिक, तरुणाइपासून ते माता-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून दोन्ही उमेदवारांचे मन भरून आले.
प्रचार दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधताना मृणाल म्हाळसकर यांनी कातवीच्या मातीशी असलेलं आपलं नातं पुन्हा अधोरेखित केले. “येथील प्रत्येकाशी असलेली आत्मीयता आणि प्रेम हे माझं सर्वात मोठं बळ आहे. कातवीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे ते म्हणाले.
प्रभाग क्रमांक २ चे उमेदवार दिनेश ढोरे हे नागरिकांमध्ये मिसळणारे, प्रभागातील मूलभूत समस्यांची जाण असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता, ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांच्या उन्नतीस प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही मृणाल म्हाळसकर यांनी दिली.
कातवीतील दौऱ्यानंतर प्रचाराचा विस्तार प्रभाग क्रमांक १४ मधील दिपाली मोरे आणि प्रभाग क्रमांक १५ मध्येही करण्यात आला. या दोन्ही प्रभागांमध्ये झालेल्या घरदारी भेटीदरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास आणि पाठिंबा लक्षवेधी ठरला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांचा हा प्रचारदौरा अधिक वेगाने सुरू असून “वडगावच्या सर्वांगीण विकासात कातवीला अग्रस्थानी नेणे हा आमचा संकल्प आहे,” असे म्हाळसकर यांनी सांगत प्रचार मोहीम अधिक तीव्र करण्याची भूमिका स्पष्ट केली.
कातवी, प्रभाग २, १४ व १५ या सर्वच भागांत उमेदवारांना मिळालेला प्रतिसाद बघता निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.




















