Homeमहत्त्वाचेखासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन

पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरण ९५ टक्के भरले आहे. शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी पवना धरणातील जलसाठ्याचे पूजन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी चिंचवड सह मावळ तालुक्यातील अनेक गावांची पाण्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणात सध्या वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा आहे.

यावेळी बोलताना खासदार बारणे म्हणाले की मागील आठ वर्षापासून धरणातील ८५हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे त्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता वाढली आहे. पवना नदी सुधार प्रकल्प राबवण्यासाठी पाठपुरावा केल्याने हे यश आले आहे. पी एम आर डी ए आणि पिंपरी चिंचवड महापालिका नदी सुधार प्रकल्प राबविणार आहे. नदी स्वच्छ रहावी याकरता नदीकाठच्या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत त्यामुळे नदीपात्रात अशुद्ध पाणी जाणार नाही नागरिकांना आणखी शुद्ध पाणी मिळेल. महापालिकेचा पाणी शुद्धीकरण करण्याचा खर्च कमी होईल.

गाळ काढल्यामुळे धरणातील साठवण क्षमता वाढली असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही. या जलपूजनाच्या वेळी पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया, मावळ तालुका शिवसेनाप्रमुख राजेश खांडभोर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव, तळेगाव शिवसेना शहरप्रमुख देवा खरटमल, मावळ उपतालुकाप्रमुख राम सावंत, चंद्रकांत भोते, धनंजय नवघणे, अमित कुंभार, विशाल हुलावळे, सुदर्शन देसले, नवनाथ हरपुडे, प्रवीण ढोरे, मदन शेडगे हे शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!