Homeमहत्त्वाचेगोडुंब्रे परिसरात बिबट्याची दहशत वाढली; नागरिक भयभीत, वनविभाग सतर्क 

गोडुंब्रे परिसरात बिबट्याची दहशत वाढली; नागरिक भयभीत, वनविभाग सतर्क 

गोडुंब्रे परिसरात बिबट्याची दहशत वाढली; नागरिक भयभीत, वनविभाग सतर्क 

गोडुंब्रे(मावळ): गोडुंब्रे, शिरगाव परिसरात गुरुवारी रात्री पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा असून, प्रत्यक्ष रात्रीच्या वेळी बिबट्या दिसल्याने दहशत अधिकच वाढली आहे. पोलिस पाटील उमेश सावंत यांनी रात्री गडद अंधारात घराशेजारी असलेल्या भात खाचरातून बिबट्या चालताना पाहिल्याची माहिती दिली. त्यांनी तत्काळ वनविभागाला याबाबत कळवले.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या गोडुंब्रे परिसरात ऊस व भात शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला आडोसा मिळत आहे. त्यामुळे त्याचे वारंवार दर्शन होत असून, त्याच्या उपस्थितीला नाकारता येणार नाही. बिबट्याच्या हालचाल सुरू असल्याने वनविभागाने परिसरात दोन कॅमेरे बसवून हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. हालचाली निश्चित झाल्यास पिंजरा लावण्याची तयारीही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गोडुंब्रे, शिरगाव, साळुंब्रे, दारूंब्रे. चांदखेड, पुसाणे या भागात काही दिवसांपासून बिबट्या दिसल्याच्या चर्चा सुरू असून नागरिक भयभीत झाले आहेत. चार दिवसांपूर्वी चांदखेड येथे एका पाळीव कुत्र्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर गोडुंब्रे भागात बिबट्या दिसल्याने नागरिक सतर्क झाले आहेत. रात्रीच्या वेळी शेतकरी व गावकरी बाहेर पडताना अधिक काळजी घेत आहेत.

परिसरात भरपूर झाडी, पाण्याचे स्रोत आणि शेती असल्याने बिबट्याचा वावर नैसर्गिकरीत्या वाढल्याचे वनाधिकारी प्रकाश शिंदे यांनी सांगितले. “शेतीमध्ये ऊस कमी झाल्यास किंवा हालचाल स्पष्ट झाली तर पिंजरा लगेच लावला जाईल. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण असून, विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. वनविभागाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे,असे परिसरातील अनेक नागरिकांनी सांगितले.

वनविभागाचा सूर असा की, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांना सुरक्षिततेचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी काही दिवसांत बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन आवश्यक पावले उचलली जातील.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे=मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!