Homeमहत्त्वाचेग्रामीण भागातील भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे अपर जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश

ग्रामीण भागातील भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे अपर जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश

पुणे : पुणे ग्रामीण भागात वाढत्या लोकसंख्येसोबतच औद्योगिक वसाहतींमुळे बाहेरून मोठ्या प्रमाणावर मजुर, कर्मचारी व विविध कामगार वर्ग येऊन राहू लागला आहे. यामुळे ग्रामीण भागात घरमालकांकडून भाड्याने घरे देण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याने भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याकडे अनिवार्यपणे सादर करण्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत.

घरमालकांनी भाडेकरू ठेवताना पुढील माहिती व कागदपत्रे स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी –

भाडेकरूचे पूर्ण नाव

सध्याचा पत्ता व मूळ पत्ता

दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे

भाडेकरूला ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता

भाडे करारनामा

ओळखपत्र (जसे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड आदी)

ग्रामीण भागात विविध ठिकाणी गुन्हेगारी, चोरी, फसवणूक तसेच दहशतवादी कारवायांचा धोका वाढलेला आहे. अशा परिस्थितीत कोणताही गुन्हा घडल्यास तात्काळ तपास व गुन्ह्याची उकल होण्यासाठी भाडेकरूंची नोंद पोलीसांकडे असणे आवश्यक असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या घरमालकांवर भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार दंडनीय कारवाई होणार आहे. त्यामुळे घरमालकांनी जबाबदारीने भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.

हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील. त्यानंतर परिस्थितीनुसार प्रशासनाकडून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही अपर जिल्हा दंडाधिकारी कदम यांनी नमूद केले आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे. मो. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!