Homeमहत्त्वाचेबोर घाटात जड अवजड वाहनांना बंदी. रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांचा निर्णय

बोर घाटात जड अवजड वाहनांना बंदी. रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांचा निर्णय

बोर घाटात जड अवजड वाहनांना बंदी. रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांचा निर्णय

खंडाळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) वरील बोरघाट परिसरात वारंवार होणाऱ्या जड अवजड वाहनांमुळे वारंवार अपघातांच्या घटना घडत होत्या. या अपघातांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत होती, तर कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न उपस्थित होत होता. विशेष म्हणजे, बोरघाट हा तीव्र वळणांनी भरलेला व चढउताराचा रस्ता असल्याने मोठ्या वाहनांना तोल सांभाळणे कठीण जाते. परिणामी, वेगावर नियंत्रण सुटून मोठे अपघात घडतात.

या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या घाटातून सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांवर तात्काळ बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.यासंदर्भात रायगड जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अवजड वाहनांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती.

या मागणीला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तातडीने कारवाई केली असून, अधिसूचनेद्वारे जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला आहे. हा निर्णय राबविल्यामुळे बोरघाटातून हलक्या वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू राहील आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, जड वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा विचार करावा लागणार असून, वाहतूक विभागाकडून त्याबाबत स्वतंत्र मार्गदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश तात्पुरता असला तरी तो पुढील काळात कायमस्वरूपी स्वरूपात लागू होऊ शकतो, अशी चर्चाही प्रशासन व वाहनचालकांमध्ये सुरू आहे. अपघात रोखणे आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला हा निर्णय नागरिकांकडून स्वागतार्ह ठरत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!