नेरे-उर्से रिंगरोड व टिपी योजना रद्द करण्याची मागणी
माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली PMRDE कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक
आकुर्डी : पिंपरी-चिंचवड महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDE) तर्फे प्रस्तावित करण्यात आलेली नेरे-सांगवडे-दारुंब्रे-साळुंब्रे-गोडुंब्रे-धामणे या गावांतील नगररचना योजना तसेच नेरे ते उर्से दरम्यानची ६५ मीटर रिंगरोड योजना रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डी येथील PMRDE कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीला PMRDE चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, नगररचना संचालक अविनाश पाटील, सहसंचालक श्वेता पाटील उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या समस्या व प्रकल्पामुळे होणारे परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर बोलताना माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे म्हणाले :
> “ही दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत. सुमारे २१०० एकर बागायती शेती या प्रकल्पामुळे बाधित होणार असून तीच जमीन शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या योजना आम्ही होऊ देणार नाही. जोपर्यंत या योजना पूर्णपणे रद्द होत नाहीत तोपर्यंत संघर्ष सुरू राहील. मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.”
भेगडे यांनी पुढे सांगितले की, लवकरच शेतकरी बांधवांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत थेट चर्चा केली जाईल.
या बैठकीत शेतकरी बांधवांनी देखील ठामपणे भूमिका मांडली की,
> “या दोन्ही योजना रद्द होईपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील.”
यावेळी नेरे, सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, धामणे या गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीतून शेतकऱ्यांचा एकजूट निर्धार स्पष्ट दिसून आला.
(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११)



















