माजी विद्यार्थ्यांची २७ वर्षांनी पुन्हा भरली शाळा
पवनानगर:२७ वर्षापूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकावरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला निमित्त होते. मावळ तालुक्यातील पवनानगर येथील पवना विद्या मंदिर च्या १९९८/१९९९ सालच्या एसएससी बॅच च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे मंगळवार दिनांक २७ मे २०२५ रोजी सकाळी ९:३० ते १० या वेळेत सर्व माजी विद्यार्थी व शिक्षकांना अल्पोहार देण्यात आला.१०:३० ते ११ या वेळेत सर्व शिक्षकांचा सन्मान ११ते १२ शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनोगत १ ते २ स्नेहभोजन २ ते ३ खेळ गप्पागोष्टी गायनाचा कार्यक्रम व निरोप समारंभ याचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच या स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थी नवनाथ भालेसाइन व शिक्षक पडवळ यांनी आपल्या गायनाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. माजी विद्यार्थी यांच्या वतीने पवना विद्या मंदिर चे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांना दहा हजार रुपये शाळेच्या विकासाला हातभार लावण्यासाठी देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी केक कापून स्नेहसंमेलनाचा आनंद घेतला. गणेश ठाकर या माजी विद्यार्थ्यांच्या टेन्ट हाऊस वर सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, बाळासाहेब कदम व अन्य १२ शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी यशस्वी उद्योजक अजित कुंभार म्हणाले की शालेय जीवनातील क्षण हे आपल्या आठवणीतच राहतात एकदा शाळा सोडली की व्यक्ती त्याकडे परत पाहत नाही शाळेचे दिवस पुन्हा येत नाही आज आपण २७ वर्षांनी परत एकदा शाळेत आलो आहोत तसेच यापुढे दरवर्षी शाळेत उपस्थित राहू गणेश ठाकर, नवनाथ भालेसाइन व अन्य विद्यार्थ्यांनी शाळेतील आपल्या गोड आठवणींना यावेळी उजाळा दिला.
अजित कुंभार, गीता गांधी, रेखा गांधी, कविता कालेकर, वंदना काळे, गणेश ठाकर, सविता ठाकर, सुभाष दहिभाते, अनंता जाधव, मास्तर पडवळ, रामदास घारे, अंकुश कालेकर, भानुदास मोहिते, अनिल निंबळे, बाळू कदम, रेखा काळे, पुष्पा ठाकर, लक्ष्मण ठाकर, कांता ठाकर, संतोष ठाकर, संजय राठी, वैशाली गोसावी, दत्ता निबळे, संतोष लोखंडे, मोतीलाल बोहरा, कौशल्या रासनकर, आदी माजी विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
सर्व माजी विद्यार्थी आज आप आपल्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. आपल्या यशस्वी आयुष्याचे श्रेय शिक्षकांचे आहे असे अनेक विद्यार्थ्यांनी याप्रसंगी सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कदम(सर) यांनी केले. प्रस्ताविक माजी विद्यार्थी अजित कुंभार यांनी केले तर आभार गणेश ठाकर यांनी मानले.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















