Homeराजकीयमावळ तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी, मेघाताई भागवत यांना आंबी गावात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मावळ तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी, मेघाताई भागवत यांना आंबी गावात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून सर्वच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. गावागावांत, वाड्या–वस्त्यांवर जाऊन मतदारांशी संवाद साधत, आपापली भूमिका मांडताना अनेक उमेदवार दिसत आहेत. नागरिकांच्या भेटीगाठी, प्रचारसभा आणि घराघरांतून संवाद साधण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडत आहे.

याच पार्श्वभूमीवर वराळे–इंदोरी गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांनी आंबी गावात महिलांच्या गाठीभेटींचा दौरा आयोजित केला. त्यांनी विविध गावांमधील माता-भगिनींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेतले. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मेघाताई भागवत यांच्या कार्यावर आपला विश्वास व्यक्त केला.

गाठीभेटींच्या दरम्यान महिलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी आपल्या भावना मांडताना, “मेघाताई आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांसाठी काम करणाऱ्या खऱ्या लोकनेत्या आहेत,” अशा शब्दांत समर्थन व्यक्त केले. महिलांनी एकमुखाने सांगितले की, “आम्ही सर्व मेघाताई भागवत यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”

या दौऱ्यात मेघाताई भागवत यांनी सांगितले की, “महिलांच्या विकासाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपक्रम राबवणे हे माझे ध्येय आहे.” त्यांच्या या संवाद दौऱ्यामुळे गटातील राजकीय समीकरणे आणखी रंगतदार बनली आहेत.

मावळ तालुक्यातील या आगामी निवडणुकीत महिलांचा वाढता सहभाग आणि उमेदवारांना मिळणारा लोकसंपर्क पाहता, पुढील काही दिवसांत निवडणुकीचे वातावरण अधिकच तापणार हे निश्चित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!