Homeराजकीयराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अबोली मयूर ढोरे तसेच सर्व अधिकृत...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अबोली मयूर ढोरे तसेच सर्व अधिकृत नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा जोर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अबोली मयूर ढोरे तसेच सर्व अधिकृत नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा जोर

वडगाव| वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अबोली मयूर ढोरे तसेच सर्व अधिकृत नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा जोर आज अधिक वाढला, कारण आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत वडगाव मावळ परिसरात भव्य प्रचार दौरा आयोजित करण्यात आला.

दौऱ्याला पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यामध्ये माजी सभापती गणेशआप्पा ढोरे, माजी सरपंच बाळासाहेब ढोरे, पंढरीनाथ ढोरे, तुकाराम ढोरे, अविनाश चव्हाण, राजेंद्र चव्हाण, विलास दंडेल आदी मान्यवरांचा सक्रिय सहभाग

प्रचार दौऱ्यादरम्यान वडगाव शहरातील नागरिकांनी उमेदवारांचे शेकडोच्या संख्येने स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रस्त्यांवर उमटलेली गर्दी, जयघोष आणि महिलांसह युवा वर्गाची उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसरात निवडणूक वातावरणाला विशेष रंगत आली. नागरिकांनी उमेदवारांप्रती व पक्षावरील आपला अढळ विश्वास स्पष्टपणे व्यक्त केला.

दौऱ्यात सर्व उमेदवारांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक पातळीवरील विकासकामांबाबतची मागणी जाणून घेतली. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर नागरिकांनी मोकळेपणाने आपले मत व्यक्त केले.

हा प्रचार दौरा केवळ निवडणुकीपुरता नसून “वडगावच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा” संकल्प असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी यावेळी सांगितले. तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अबोली मयूर ढोरे यांनी नागरिकांना विश्वास दिला की, “विकासाचे काम घरापर्यंत पोहोचेल, आणि पारदर्शक प्रशासन हेच प्राधान्य असेल.”

दौऱ्यात दिसलेला नागरिकांचा उत्साह व उमेदवारांना मिळालेला प्रचंड पाठिंबा पाहता वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित असल्याचे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!