Homeसामाजिकलग्न सोहळ्याच्या आनंदावर अवकाळी पावसामुळे विरजण. विवाहाच्या दिवशी पाऊस पडणे शुभ की...

लग्न सोहळ्याच्या आनंदावर अवकाळी पावसामुळे विरजण. विवाहाच्या दिवशी पाऊस पडणे शुभ की अशुभ?

लग्न सोहळ्याच्या आनंदावर अवकाळी पावसामुळे विरजण. विवाहाच्या दिवशी पाऊस पडणे शुभ की अशुभ?

तळेगाव दाभाडे : शकुन शास्त्र व घरातील जेष्ठ मंडळी काय म्हणतात यासंदर्भात सध्या मावळ तालुक्यात लग्नाचा मोसम जोरात सुरू असून शहर व ग्रामीण भागात लग्न सोहळे विविध मंगल कार्यालयात सुरू आहेत. या लग्न सोहळ्यावर पावसाचे सावट पडत असल्याने वऱ्हाडी मंडळी यांच्या आनंदावर व लग्न सोहळ्यात अडथळे निर्माण होत आहे असे असताना विवाहाच्या दिवशी पाऊस पडणे शुभ की अशुभ यासंदर्भात शकुन शास्त्र तसेच घरातील ज्येष्ठ मंडळी काय म्हणतात ते पाहणे गरजेचे आहे.

शकुन शास्त्रानुसार लग्नाच्या दिवशी पाऊस पडणे अत्यंत शुभ मानले जाते. विवाहाच्या दिवशी पाऊस पडत असेल तर याचा अर्थ सर्व देव देवतांच्या आशीर्वाद वधू-वरांना मिळतो आहे. आता विवाहाच्या दिवशी अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे अडचणी येतात पण तरीही वधूवरांसाठी पाऊस शुभ मानला जातो. हिंदू धर्मात पावसाला सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले गेले आहे. पाऊस म्हणजे हिरवळ जीवनातील मरगळ दूर करणारा आनंद व उत्साह वाढवणारा धरती मातेला हिरवेगार करणारा लग्नाच्या दिवशी पाऊस पडल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहते वधू-वरांमधील सामंजस्य वाढते आणि ते एकमेकांना संभाळत सुखाचा संसार करतात असे देखील जेष्ठ मंडळी सांगतात तसेच अशी देखील मान्यता आहे की ज्या वधू-वरांच्या लग्नाच्या दिवशी पाऊस पडतो त्यांना संततीसुख लवकर प्राप्त होते.

आणि पावसाचे थेंब वधूवरांना बांधलेल्या लग्न गाठी वर पडल्यास वधूवरांचे नाते अधिक मजबूत होते. कारण पावसामुळे गाठ ओली झालेली असते. वधू वर सप्तपदी घेत आहेत किंवा शुभविधी सुरू आहेत आणि पाऊस आला तर तो शुभ मानला जातो. यामुळे वधू-वरांचे जीवन अधिक समृद्ध मजबूत व सुखी होते.ज्या वधूवरांच्या लग्नात पाऊस पडतो तो लग्न सोहळा देखील अनेकांच्या आठवणीत राहतो. वधूवरांना आयुष्यभर नातेवाईक मित्रपरिवार सांगतात की तुमच्या लग्नात पाऊस पडला होता. त्यामुळे लग्नाच्या आठवणी आयुष्यभर वधू-वरांच्या देखील लक्षात राहतात. त्यामुळे वधू-वरांनी नाराज होऊ नये असे देखील जेष्ठ मंडळी सांगतात.

प्रातिनिधि:गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!