Homeराजकीयलोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद; नागरिकांचा उमेदवारांना दमदार पाठिंबा

लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद; नागरिकांचा उमेदवारांना दमदार पाठिंबा

लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद; नागरिकांचा उमेदवारांना दमदार पाठिंबा

लोणावळा नगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार मोहीमेला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद आता शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार करत आहे. दिनांक २२ नोव्हेंबर रोजी नगरसेवक पदाचे उमेदवार मुकेश परमार, नगरसेविका पदाच्या उमेदवार वसुंधरा दुर्गे (प्रभाग क्र. ५) तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र बबनराव सोनवणे यांनी नांगरगाव परिसरात नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आगामी निवडणुकीत मतदानासाठी आवाहन केले. या दौऱ्याला स्थानिक नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष लक्षवेधी ठरला.

लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला दिवसेंदिवस जोर मिळत असून, प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद हा पक्षाच्या वाढत्या बळकटीचा सूचक मानला जात आहे. आमदार सुनील शेळके यांनी मागील काळात लोणावळा शहरात व परिसरात केलेल्या विकासकामांचा ठसा नागरिकांच्या मनात पक्का असून, त्यांच्याच विश्वासावर उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. “आमदार सुनील शेळके यांनी दिलेले सर्व उमेदवार आम्हाला मान्य आहेत; त्यांनी केलेला विकास आमच्या डोळ्यासमोर आहे,” अशा स्वरात नागरिकांमध्ये चर्चा घडताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, आमदार शेळके यांना जसा जनतेने विश्वासाने साथ दिली होती, त्याच विश्वासाने या उमेदवारांनाही मतदान करण्याची तयारी लोकांनी दाखवली आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवारांना मिळत असलेला प्रतिसाद, विशेषतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र सोनवणे यांना मिळालेली पाठराखण ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी निवडणूकसरशीचे स्पष्ट संकेत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

लोणावळ्यातील वातावरण पाहता, नागरिक आता गर्दी करून प्रचार दौऱ्यांना, गाठीभेटींना उपस्थित राहत असून उमेदवारांना प्रचंड उत्साहाने प्रतिसाद देताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी निर्माण झालेली ही सकारात्मक लाट पाहता, येणारी निवडणूक पक्षासाठी भक्कम फरकाने जिंकण्याची शक्यता असल्याची चर्चा शहरात वेगाने पसरत आहे.

लोणावळा नगरपालिकेची ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढवली जात असून, नागरिकांचा स्पष्ट कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकत असल्याचे चित्र आता अधिक ठळक होत चालले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!