Homeसामाजिकलोणावळ्यात अमृत कृती संगम आणि DAY NULM चा आईच्या नावाने एक झाड...

लोणावळ्यात अमृत कृती संगम आणि DAY NULM चा आईच्या नावाने एक झाड वृक्षारोपण उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात

लोणावळा : अमृत कृती संगम आणि DAY NULM अंतर्गत लोणावळा नगर परिषदेच्या विद्यमाने अमृत कृती संगम अंतर्गत बचत गटांच्या महिलांनी २१मे २०२५ पासून झाडे लावणे आणि झाडे संगोपन करण्याच्या कार्यक्रमास पहिल्या टप्प्याला सुरुवात केली आहे. या अभियाना अंतर्गत खंडाळा तलावाच्या बाजूने २० झाडे लावण्याचे काम खंडाळा येथील हिरकणी बचत गटाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.

तसेच या वृक्षांच्या संगोपनाचे काम हिरकणी गटाच्या महिला पुढील २ वर्षात करणार आहे. अमृत कृती संगम आणि DAY NULM अभियानाच्या समूह कृती संगम अंतर्गत पहिल्या टप्प्यात वृक्षारोपणासाठी जागेची पाहणी व निश्चितीकरण करण्यात येणार असून २१मे २०२५ रोजी खंडाळा तलाव परिसरामध्ये हे सर्वेक्षण घेण्यात आले. २२मे २०२५ रोजी सकाळी रामनगर येथे तुळजाभवानी गटाच्या वतीने साईट सर्वेक्षण होणार असून २३मे २०२५ रोजी हनुमान टेकडी येथे बुद्ध रत्न बचत गटाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

अशी माहिती नोडल अधिकारी दिलीप गायकवाड यांनी दिली आहे. खंडाळा तलावाच्या बाजूने झाडे लावण्याच्या संदर्भात हिरकणी बचत गटाच्या महिलांकडून झाडे लावण्याबाबत पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करण्यात आले असून आईच्या नावाने एक झाड वृक्षारोपण या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याच्या प्रसंगी कर निर्धारण अधिकारी विद्या कारचे, शहरा अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड, उपजीविका केंद्राच्या संगीता पवार, सीमा पवा,. संगीता वीरभद्रे, पूजा राठोड तसेच हिरकणी बचत गटाच्या अध्यक्षा अश्विनी काकडे व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी अमृत कृती संगम या अभियानाची माहिती दिली.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!