Homeराजकीयकुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत चे सदस्य संजय गुंड यांचे सदस्यत्व कायम

कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत चे सदस्य संजय गुंड यांचे सदस्यत्व कायम

लोणावळा : शहराजवळील कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत चे सदस्य संजय तुकाराम गुंड यांचा राजीनामा नामंजूर करत त्यांचे सदस्यत्व कायम ठेवण्यात यावे असा आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला आहे. २०२१साली झालेल्या कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतच्या निवडणुकीत संजय गुंड हे सदस्य म्हणून निवडून आले होते.

२७ जुलै २०२२ रोजी ते कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात मीटिंग साठी गेले असता त्यांना तुमचा राजीनामा मंजूर झाला असून तुमचे सदस्य पद रिक्त झाले असल्याने तुम्हाला मिटींगला बसता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यावेळी संजय गुंड यांनी मी राजीनामा दिला नाही मग तो मंजूर कसा झाला व कोणी माझा राजीनामा लिहून दिला असल्याची विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सदरचा तथाकथित राजीनामा गटविकास अधिकारी त्यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

ग्रामपंचायतच्या मासिक सभेत हा विषय विषय पत्रिकेत न घेता ऐन वेळेचा विषय म्हणून घेण्यात आला. याबाबत अनेक कायदेशीर बाबी. वादविवाद. जबाब नोंदवल्यानंतर सदरचा राजीनामा मंजूर करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदी चे पालन व विहित कार्यपद्धतीच्या अवलंब केला नसल्याचे निरीक्षण नोंदवत हा राजीनामा संजय गुंड यांनी दिलेला नसल्याचे अधोरेखित करत पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संजय गुंड यांचा ३० जून २०२२ रोजी मंजूर केलेला राजीनामा नामंजूर करत संजय गुंड यांचे सदस्य पद कायम ठेवण्याचा आदेश १३मे २०२५ रोजी दिला आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!