लोणावळ्यातील वाहतूक खोळंबा संदर्भात पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांची सिंघम स्टाईल कामगिरी
लोणावळा : शहर प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी सूत्रे हाती घेतल्यापासूनच वाहतूक खोळंबा संदर्भात सिंघम स्टाईल कारवाई सुरू केली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणारी दुकाने. हातगाड्या पथारीवाले. तसेच रस्त्यात बेशिस्त वाहने लावणाऱ्या वाहन चालकांना त्यांनी कडक समाज दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शेतकरी पुतळा व कुमार रिसॉर्ट पर्यंत त्यांनी पायी फिरून आढावा घेतला.
यावेळी त्यांनी बेशिस्त वागणाऱ्यांना कडक सूचना केल्या. अनेक वर्ष वाहतूक खोळंबणे. रुग्णवाहिका अडकणे. नागरिकांना पायी चालणे मुश्किल होत होते. अशा शिस्त मोडणाऱ्या ११८ वाहनचालकांवर चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी कारवाई करत १लाख १२ हजाराचा दंड वसूल केला आहे.
वाहन चालकांनी शिस्त न मोडता गाड्या पार्क कराव्यात दुकानदारांनी आपले फलक रस्त्यावर उभे करू नयेत असे त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टि यांच्या या सिंघम स्टाईल कारवाईचे लोणावळेकरांनी स्वागत केले आहे. याच पद्धतीची कारवाई पुढे देखील चालू रहावी असे अनेक नागरिकांनी सांगितले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















