वडगाव शहरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सशस्त्र रूट मार्च
वडगाव मावळ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी वडगाव मावळ पोलिस स्टेशन आणि केंद्रीय सशस्त्र दल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सशस्त्र रूट मार्च काढण्यात आला.
पोलिस निरीक्षक कुमार कदम यांची माहिती
या उपक्रमाबाबत बोलताना पोलीस निरीक्षक कुमार कदम म्हणाले, “आगामी निवडणुका व धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखणे हे आमचे पहिले उद्दिष्ट आहे. संभाव्य गोंधळ अथवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत.”
रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने जवान सहभागी
या रूट मार्चमध्ये नवी मुंबई येथील रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) बटालियन, वडगाव मावळ पोलिस अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे ५० सशस्त्र जवान सहभागी झाले.
३ पोलीस अधिकारी,
२ RAF अधिकारी,
२ वरिष्ठ अधिकारी,
१८ पोलीस अमलदार,
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) २५ जवान
अशी मोठी फौज या संचलनात सहभागी झाली होती.
शहरातील प्रमुख ठिकाणांतून संचलन
सदरचा रूट मार्च शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या भागांतून काढण्यात आला. यात तहसील कार्यालय, पंचायत समिती चौक, न्यायालय, श्री पोटोबा मंदिर, जामा मस्जिद, चावडी चौक या ठिकाणांचा समावेश होता. याशिवाय बाजारपेठ, ढोरे वाडा, मिलिंद नगर, कुढे वाडा या भागांतूनही सशस्त्र जवानांनी संचलन केले.
उद्दिष्ट – नागरिकांचा विश्वास वाढवणे
या रूट मार्चचा हेतू म्हणजे निवडणुका व सण-उत्सवांदरम्यान नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दल सदैव तत्पर असल्याचा संदेश देणे हा होता. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या वडगाव मावळात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कक्ष असल्याने पोलिस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. वडगाव शहरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सशस्त्र रूट मार्च
प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)




















