सकल मराठा परिवार मावळचा उपक्रम – पुरग्रस्तांना एक हात मदतीचा
मावळ : “मदत नव्हे, कर्तव्य” या भावनेतून सकल मराठा परिवार मावळच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक कुटुंबांचे संसार, घरे व शेती वाहून गेली आहेत. हजारो लोक बेघर झाले असून त्यांच्यासमोर उपजीविकेचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
अशा वेळी त्यांना सर्व समाजाचा आधार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. सकल मराठा परिवार मावळने यासाठी मदतीचा ध्यास घेतला असून, नागरिकांनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तातडीने आवश्यक मदत साहित्य :
किराणा किट (तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी, पोहे, कडधान्य, तेल, साखर)
पाणी बॉटल्स, आयोडीन टॅबलेट
पुरुष, महिला व मुलांचे कपडे
ब्लँकेट्स, बेडशीट्स, रेनकोट
वैद्यकीय व प्राथमिक औषधे
मुलांसाठी शालेय साहित्य
या स्वरूपातील मदत साहित्य थेट सकल मराठा परिवार मावळच्या स्वयंसेवकांकडे सुपूर्द करता येईल.
संपर्कासाठी स्वयंसेवक :
सौ. दिपाली तांबे – ९९६००६७२७५
सुभाष पिंगळे – ९७३०३०८१०८
कैलास पडवळ – ९०२८६८६६९१
वैभव ढोकले – ९९२२३०७०४४
पूरग्रस्तांच्या डोळ्यातले अश्रू पुसून त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने या मदत अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा परिवार मावळने केले आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)























