Homeराजकीयआम्ही अजित पवार यांच्यासोबतच; बबनराव भेगडे यांचा निर्वाळा

आम्ही अजित पवार यांच्यासोबतच; बबनराव भेगडे यांचा निर्वाळा

आम्ही अजित पवार यांच्यासोबतच; बबनराव भेगडे यांचा निर्वाळा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सहकार चळवळीतील अभ्यासक बबनराव भेगडे यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी आणि माझे सहकारी अजित पवार यांच्यासोबतच राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सक्रिय राहणार आहोत, अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाही,” असा निर्वाळा त्यांनी दिला.

अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर अपक्ष लढणारे बापूसाहेब भेगडे यांचे समर्थक भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे बबनराव भेगडे देखील भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यांनी शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) पुण्यात अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीनंतर हा गैरसमज दूर केला.

अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा

या भेटीत अजित पवार यांनी भेगडे यांचे योगदान अधोरेखित करत म्हटले की, “आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची पक्ष बांधणीसाठी आवश्यकता आहे. आतापर्यंत आपण केलेले कार्य महत्त्वाचे असून आगामी काळातही संघटन वाढीसाठी आपले सहकार्य हवे.”

त्यावर भेगडे यांनीही “गैरसमज आणि मतभेद विसरून पक्षाच्या कामात आम्ही पुन्हा सक्रिय होणार आहोत,” अशी ग्वाही दिली.

सहकारातील बबनराव भेगडे यांचा ठसा

भेगडे यांनी सहकार क्षेत्रात जिल्हा आणि तालुका पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. तसेच मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून चार वेळा जबाबदारी सांभाळली.

समाजवादी काँग्रेसपासून ते शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

२०० समर्थकांसह ठाम भूमिका

भेगडे म्हणाले की, “मी आणि माझे सुमारे २०० सहकारी समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष वाढीसाठी जी जबाबदारी मिळेल ती आम्ही निष्ठेने पार पाडू. मागील काही काळातील गैरसमज आता मागे सोडले असून पक्षासाठी पुन्हा एकदिलाने काम करणार आहोत.”

तसेच, पक्षाने निलंबित केलेल्या सहा पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीत उपस्थित मान्यवर

या चर्चासत्रात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक घारे, बबनराव भोंगाडे, उपसभापती नामदेव शेलार, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुनील दाभाडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर मराठे, चंद्रकांत दहिभाते, बाळासाहेब भदे, लहू सावळे, रवींद्र घारे, आयुब सिकिलकर, ॲड. साहेबराव टकले, शंकर वाजे, ॲड. ज्ञानेश्वर दाभोळे, रघुनाथ मालपोटे, नगरसेवक अभिजीत काळोखे, प्रवीण काळोखे, जयेश मोरे, नवनाथ मालपोटे, विशाल मराठे, तानाजी दाभाडे, विठ्ठल जाधव, शरद भोंगाडे, राहुल पारगे, माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रूपाली दाभाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

वडगाव येथे उद्या “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर”; नागरिकांना १५ हून अधिक महसुली सेवा...

वडगाव येथे उद्या “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर”; नागरिकांना १५ हून अधिक महसुली सेवा एकाच छताखाली उपलब्ध वडगाव मावळ : महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य...

रोहित पवारांच्या दाव्यानंतर राजकीय खळबळ; आमदार सुनील शेळकेंचे जोरदार प्रत्युत्तर

रोहित पवारांच्या दाव्यानंतर राजकीय खळबळ; आमदार सुनील शेळकेंचे जोरदार प्रत्युत्तर Rohit Pawar यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते भाजपमध्ये जाणार असून त्यांच्यासोबत १५ आमदारही जाणार...

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

error: Content is protected !!