Homeक्राईमकंटेनर खाली चिरडून दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू

कंटेनर खाली चिरडून दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू

कंटेनर खाली चिरडून दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू

चाकण : तरुणाला कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने त्याने एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. मात्र दुचाकीवरील हा प्रवास तरुणाचा अखेरचा ठरला. एका कंटेनरच्या धडकेत तरुण कंटेनरखाली चिरडला गेला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी दिनांक १४ जुलै २०२५ रोजी सकाळी पावणे सात वाजता खेड तालुक्यातील खालूंब्रे येथे घडला.

गजानन बाबुराव बोलकेकर (२६, नांदेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्य गजाननराव गायकवाड (२३, येलवाडी, खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विजय शंकरराव तंतरपाले (२४, चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद अरमान कमरुद्दीन खान (३०, धारावी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.

गजानन हा चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीत नोकरी करत होता. सोमवारी तो पहिल्या शिफ्टसाठी कामावर जाण्यासाठी घरातून निघाला. कामावर पोहोचण्यासाठी त्याला उशीर होत असल्याने त्याने रस्त्यात एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. दुचाकी चालक आदित्य गायकवाड याच्या सोबत जात असताना खालूंब्रे येथील हुंडाई चौकाजवळ आल्यानंतर कंटेनरची दुचाकीला धडक बसली. या अपघातात गजानन हा कंटेनर खाली चिरडला गेला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!