Homeआरोग्यवडगाव नगरपंचायतीत जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर; १८० हून अधिक महिलांनी...

वडगाव नगरपंचायतीत जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर; १८० हून अधिक महिलांनी घेतला लाभ

वडगाव नगरपंचायतीत जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर; १८० हून अधिक महिलांनी घेतला लाभ

वडगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बाल कल्याण समिती, वडगाव नगरपंचायत आणि विघ्नहर्ता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव कातवी शहरातील महिला भगिनींसाठी एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर सोमवार (दि. ९ मार्च २०२६) रोजी वडगाव नगरपंचायत कार्यालयात पार पडले.

शिबिराचे उद्घाटन वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले.

या आरोग्य शिबिरामध्ये डॉ. शुभांगी बहिरट, डॉ. स्मिता पालवे, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. विकास गोरख जाधवर (MD), दानी आय क्लिनिकचे डॉ. जे. के. दानी तसेच आशासेविका यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपासण्या करण्यात आल्या. शिबिरात ईसीजी, हिमोग्लोबिन, किडनी, लिव्हर, रक्त तपासणी, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, एक्स-रे तसेच डोळे, कान, नाक आणि घसा आदी तपासण्या विनामूल्य करण्यात आल्या. तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक महिलेला कॅल्शियम व आयर्न फोलिक अॅसिड गोळ्यांचेही वितरण करण्यात आले.

तसेच नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळावा यासाठी ५० महिलांची ‘आयुष्यमान भारत’ कार्डे काढून देण्यात आली. या शिबिराचा लाभ वडगाव शहरातील १८० हून अधिक महिलांनी घेतला.

दरम्यान, जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव नगरपंचायत सभागृहात शहरातील क्रीडा व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कारही करण्यात आला. नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता ढोरे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू श्रीमती हर्षदा दुबे, कु. रुचिका ढोरे, कु. हर्षदा गरुड यांचा तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. शुभांगी बहिरट व डॉ. स्मिता पालवे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शहरातील आशासेविका, महिला सफाई कर्मचारी आणि वडगाव नगरपंचायतमधील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही यावेळी भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, महिला व बाल कल्याण समिती उपसभापती पूनम भोसले, समिती सदस्य वैशाली सोनवणे, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती सौ. माया अमर चव्हाण, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती गणेश सोपान म्हाळसकर, विरोधी पक्ष नेत्या अर्चना म्हाळसकर, नगरसेविका राणी म्हाळसकर, सारिका चव्हाण, आकांक्षा वाघवले, रुपाली ढोरे तसेच नगरसेवक विशाल वहिले, अजय भवार, अनंता कुडे, पंढरीनाथ ढोरे आदी उपस्थित होते.

वडगाव नगरपंचायतीमध्ये सध्या नगराध्यक्षा, महिला व बाल कल्याण सभापती, आरोग्य सभापती तसेच विरोधी पक्षनेते ही पदे महिलांनी भूषविल्याने शहरात महिलांचे प्रभावी नेतृत्व असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंब आणि समाजाचे आरोग्यही सुदृढ राहते, त्यामुळे भविष्यातही महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास नगराध्यक्षा व महिला व बाल कल्याण सभापती यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात अर्चना म्हाळसकर,  पूनम भोसले, माया अमर चव्हाण, आकांक्षा वाघवले, रुपाली अतुल ढोरे व अजय महेंद्र भवार यांनी मनोगत व्यक्त करून महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा चव्हाण (कार्यालय अधीक्षक, वडगाव नगरपंचायत) यांनी केले.

उपस्थितांचे आभार मानताना वडगाव नगरपंचायत प्रशासन व सर्व नगरसेवक मिळून शहरातील महिला व बालकांसाठी भविष्यातही सकारात्मक व लोकहिताचे निर्णय घेत राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!