Homeमहत्त्वाचेआंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ जयंत नारळीकर यांचे...

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ जयंत नारळीकर यांचे निधन

विज्ञान आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डॉ जयंत नारळीकर यांचे आज मंगळवार दिनांक २०मे २०२५ रोजी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. जयंत नारळीकर यांना वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता यावरून त्यांची प्रखर बुद्धिमत्ता स्पष्ट होते.

११ जुन १९६४ रोजी त्यांनी गुरुत्वा कर्षणा संबंधीचा सिद्धांत मांडला होता त्यातूनच पुढे विश्वनिर्मितीच्या रहस्य वरील संशोधनाला जगात चालना मिळाली. जयंत नारळीकर हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व मराठी विज्ञान कथेला आधुनिक चेहरा देणारे लेखक होते.९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.

डॉक्टर नारळीकर हे विज्ञाननिष्ठ भूमिकेसाठी ओळखले जात त्यांनी लिहिलेल्या विज्ञान कथा आणि विज्ञान विषयक लेख समाजात लोकप्रिय ठरले आहेत.

भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने गौरविले आहे. तसेच स्मिथ प्राईज, ॲडम्स प्राईज, प्रिक्स ज्युल्स जॅन्सेन अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने देखील डॉ जयंत नारळीकरांचा गौरव झाला आहे. अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफारीला, टाईम मशीनची किमया, प्रेषित, यक्षाची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते. गणितातील गमती जमती, नभात हसरे तारे, नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान, इत्यादी अनेक पुस्तके लिहून त्यांनी साहित्य विश्वाची देखील सेवा केली आहे. त्यांच्या निधनावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!